spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या बैठकीत वाद, वरून सरदेसाई यांना ……

शिवसेना मध्ये बंड झाल्यावर पाहिलांदाच दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होत आहे. मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना आणि युवासेने पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे बैठक पार पाडण्यात आली. या बैठकी मध्ये विभागप्रमुख आणि यवसेनेचे वरून सरदेसाई यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे. रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले आहेत. तरीही रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम युवासेनेच्या (Yuva Sena) कोअर कमिटी कार्यकारणीत आहे. त्यांना युवासेनेच्या कार्यकारिणीत अजूनही स्थान कसे काय?, असा सवाल शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांना विचारला. विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस यांनी युवासेनेच्या नेत्यांना जाब विचारल्यामुळे या बैठकीतील वातावरण तापल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दसऱ्या मेळाव्या साठी आता काही तास फक्त उरले आहे आणि या साठी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. तेव्हा हा प्रसंग घडला. सुधाकर सुर्वे आणि आणि विलास पोतनीस यांनी वरुण सरदेसाईंना सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कार्यकारिणीत कसे राहिले, असा जाब विचारला. यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच मोठा वाद झाला. यानंतर इतर नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला. मात्र, आगामी काळात शिवसेना पक्षात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई यांनी सुर्वे आणि पोतनीस यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे युवासेनेचे वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण निरुत्तर झाले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये रामदास कदम यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक स्वरुपाची टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी कोणताही मुलाहिजा बाळगला नव्हता. त्यामुळे शिवसैनिक रामदास कदम यांच्यावर चांगलेच संतापले होते. तरीही रामदास कदम यांचे सुपुत्र युवासेनेच्या कार्यकारिणीत कसे राहू शकतात, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांना दिलासा नाहीच, आता १० ऑक्टोबर पर्यंत ईडी कोठडी

Gautam adani : गौतम अदानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात आणखी तीन कंपन्या जोडल्या, आता शेअर्सला गती मिळाली

Follow Us

Latest Posts

Don't Miss