spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Dasara 2022 : द्या दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा !

सध्या नवरात्र सुरू असून लवकरच विजयादशमी साजरी केली जाईल. विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Happy Dussehra 2022 : सध्या नवरात्र सुरू असून लवकरच विजयादशमी साजरी केली जाईल. विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात.

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. तंत्रज्ञानाच्या युगात कुठल्याही सणाच्या मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा उत्साह द्विगुणित केला जातो.

पूर्वी सगळे पाहुणे मंडळी एकत्र येऊन सण साजरे करायचे. लहान मुले, भरलेले घर, आंगणातील रांगोळी, गोडधोड जेवण, याची रेलचेल असायची. पण, आता कोणालाही वेळ नसतो. आपण कामाचा व्याप इतका मागे लावून घेतला आहे की, एकमेकांना शुभेच्छा द्यायला पण आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे सण आणि शुभेच्छा व्हर्च्युअल झाल्या आहेत. सरा शुभेच्छा संदेश, दसरा शुभेच्छा स्टेटस, घेऊन आलो आहोत.जे तुम्ही आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या दसरा शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक वर पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी काही खास संदेश पाहूयात.

  • “आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी
    दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृद्धी नांदो तुमच्या जीवनी”
  • “झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
    सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
    पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
    विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा”
  • सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू यशाचे शिखर, प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!! दसऱ्याचा शुभेच्छा!
  • रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…सदैव असेच राहा…HAPPY DASEHRA
  • आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
  • झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

 

हे ही वाचा:

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

IND vs SA : केएल राहुल, विराटला अंतिम सामन्यासाठी दिली विश्रांती, तर आजच्या सामन्यात शाहबाजचे पदार्पण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss