Sunday, September 29, 2024

Latest Posts

सप्तश्रृंगी गडावरील बोकड बळी प्रथेला महंत अनिकेत शास्त्री यांचा विरोध

महंत अनिकेत शास्त्री यांनी स्टंपश्रुंगी गडावर बोकड बाली प्रथेला विरोध केला आहे. धर्मशास्रात कुठेही पशुबळीचा उल्लेख नाही, किंवा पशुबळी दिल्याने देवता प्रसन्न होते. असेही कुठे नमूद करण्यात आलेले नाही आणि त्यामुळे सप्तशृंगी गडावरील (Saptashrungi Gad) बोकड बळी प्रथा बंद करण्यात यावी, न्यायालयाने निर्णयाचा पुनर्विचार करावा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा महंत अनिकेत शास्त्री महाराज (Aniket Shasri Maharaj) यांनी दिला आहे. यावरून आता नवीन वादाला सुरवात होते कि काय अशी शंका उपस्थित झाली आहे.

उद्या नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रुंगी गडावर दसर्‍याच्या दिवशी बोकडाची बळी देण्याची शेकडो वर्षांची परंपरा होती. मात्र २०१६ साली एका घटनेमुळे प्रशासनाने या प्रथेवर बंदी आणली होती. आता तब्बल ५ वर्षांनी ही प्रथा पुन्हा सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाकडून काही अटी-शर्तींसह बोकडाच्या बळीसाठी परवानगी दिली आहे. यामुळे भाविकांमध्ये उत्साह पसरला होता. उद्या होत असलेल्या दसऱ्याच्या दिवशी काही अटी शर्तीसह बोकड बळी दिला जाणार आहे. दरम्यान पाच वर्षांनी बोकड बळी प्रथेला न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर मात्र नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज व इतर साधू महंतांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. त्याचबरोबर अनिकेत शास्त्री यांनी आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रथा परंपरानुसार सप्तश्रृंगी गडावर विजया दशमी उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पार पाडण्यात येणार आहे. तब्बल पाच वर्षानंतर बोकड बळी प्रथा सुरु होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पहिला मिळत आहे. मात्र बोकड बळी प्रथेला साधू महंताचा विरोध असून नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांनी आमरण उपोषणचा इशारा दिला असून रामकुंडावर आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

२०१६ साली दसर्‍याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सप्तश्रुंगी गडावरील सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या रायफलमधून गोळी सुटली होती. सुदैवाने ही गोळी थेट कुठल्याही भविकाला न लागता भिंतीवर आदळली. मात्र गोळी भिंतीवर आदळल्यानंतर गोळीचे आवरण फुटून त्याचे तर्फे भाविकांच्या अंगावर उडाले. यासर्व घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी १२ भाविक किरकोळ जखमी झाले होते. यानंतर झालेल्या चौकशीअंती अखेर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण यांनी सर्व घटनेला बोकडबळीच्या विधी वेळी होणारा गोंधळ व हुल्लडबाजीला दोषी धरत बोकडबळीच्या परंपरेवरच बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता न्यायालयाने बोकड बळी प्रथेला काही अति शर्तीवर सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

हे ही वाचा:

दिवाळीनिमित्त शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा

देशातील राजकारण्यांची झोप उडवणाऱ्या सत्ता पालटावरचं ‘महासत्तांतर’ प्रकाशित

Follow Us

Latest Posts

Don't Miss