spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thackeray Vs Shinde : चिन्हाच्या लढाईत ७ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही बाजूंना कागदपत्रं सादर करावी लागणार

एकीकडे पोटनिवडणूक जाहीर तर दुसरीकडे चिन्हाची लढाई जोरदार सुरु आहे. ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) लढाईत आता ७ ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे.

एकीकडे पोटनिवडणूक जाहीर तर दुसरीकडे चिन्हाची लढाई जोरदार सुरु आहे. ठाकरे (Thackeray Group) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) लढाईत आता ७ ऑक्टोबर ही तारीख निर्णायक ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना ७ ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडायला सांगितलं आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस चिन्हाच्या लढाईत महत्त्वाचे ठरणार आहेत.

ठाकरे गट – चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाचीच स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल.

शिंदे गट – तर शिंदे गटाचं म्हणणं आहे की विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं.

७ तारीख का महत्त्वाची – आता या लढाईत ७ तारीख ही दोन अर्थांनी महत्त्वाची आहे. ७ तारखेलाच पोटनिवडणुकीचं नोटिफिकेशन निघतंय. म्हणजे त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा आहे. तर दुसरीकडे त्याच दिवशी आयोगातली कागदपत्रं सादर करण्याची मुदत. त्यामुळे चिन्हाबाबत काही निर्णय होऊ शकेल का याची उत्सुकता आहे.

शिंदे गटाची कागदपत्रं आधी आम्हाला मिळावीत या ठाकरे गटाच्या मागणीवर आयोगाने शिंदे गटालाही नोटीस बजावली आहे. ७ तारखेपर्यंत आणखी सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासही सांगितलं आहे. शिवाय ठाकरे गटही आपली प्राथमिक कागदपत्रं ७ तारखेपर्यंत आयोगात देणार असल्याची माहिती आहे.

आता बघावं लागेल की या प्राथमिक कागदपत्रांवरच निवडणूक आयोग चिन्हाबाबत काही तात्पुरता निर्णय घेऊ शकतंय का… कारण भलीमोठी कागदपत्रं असल्याने ती तपासण्यात वेळ तर बराच लागणार. तोपर्यंत एखादा तात्पुरता निर्णय तर आयोगाला करावाच लागणार आहे. फक्त हा निर्णय एकदा केल्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत तो कायमच राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने धनुष्यबाण एका गटाला मिळतं की गोठवलं जातं हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार शिंदे गटाचा आहे की भाजपचा याने काही फरक पडणार नाही. शिंदे गटाने विरोध केल्याने धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळणार का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. चिन्हाची केस आयोगाच्या दारात होईपर्यंत मध्येच निवडणूक जाहीर झाली की अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलं जातं हा आजवरचा इतिहास आहे. पण सध्याच्या केसमध्ये दोन्ही गटाचा दावा वेगवेगळा आहे.

हे ही वाचा:

Iranian Passenger Jet : इराणहून चीनकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, एजन्सी सतर्क

Milind Narvekar: शिंदे गटात सामिल होण्याच्या चर्चेला मिलिंद नार्वेकरांनी लावला पूर्णविराम, एक सूचक ट्वीट करत म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss