spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमानिमित संघाकडून अॅड. सदवार्ते यांना प्रमुख अतिथीचं निमंत्रण

एसटी आंदोलनात प्रमुख भूमिका बजावत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना संघाच्या यंदाच्या दसऱ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे. या आधी अॅड. सदावर्ते यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करत गांधीजींवर टीका केली होती. त्यानंतर संघाच्या कार्यक्रमासाठी त्यांना देण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
यंदाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. यंदाच्या विजयादशमीच्या एका कार्यक्रमाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. विजयादशमी निमित्ताने नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष असतं. या दिवशी विविध ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन केलं जातं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी रान उठवलं होतं. अॅड. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी मोठा संप घडवून आणला होता. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतरही त्यांनी यासाठी लढा सुरुच ठेवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर सदावर्ते यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.

गांधीवादाने देशाची फसवणूक केल्याचा आरोप अॅड. सदावर्तेंनी केला होता. देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून करण्यात येत असल्याचंही त्यांनी या आधी वक्तव्य केलंय. दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला विजयादशमी उत्सव असं म्हटलं जातं. संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराच्या समोरील रेशीम बाग मैदानावर हा मेळावा पार पडतो. पहाटे संघाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने रेशीमबागपासून पथसंचलन करतात. त्यानंतर स्वयंसेवक रेशीम बाग मैदानावर शारीरिक कवायती आणि कसरतींचे प्रात्यक्षिक करतात.

हे ही वाचा:

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा?आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून निर्णय घेतील- बाळासाहेब थोरात

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा, ज्याने काँग्रेसचे नशीब बदलले, जाणून घ्या काय घडलं होते

Follow Us

 

Latest Posts

Don't Miss