spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अत्यंत उत्तम पद्धतीने काम करीत आहे. ते कोसळण्याबाबत अनेक जण भाकीत करीत असले तरी ते होणार नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. दुसऱ्या टप्प्यात ‘रिपाइं’ला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पक्ष सर्व जातिधर्मांसाठी व्यापक करण्यास आम्ही आतापर्यंत अपयशी ठरल्याची खंत व्यक्त करून यासाठी आम्ही आता जोमाने प्रयत्न करणारअसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : 

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा, ज्याने काँग्रेसचे नशीब बदलले, जाणून घ्या काय घडलं होते

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर आहे, ते कोणत्याही स्थितीत कोसळणार नाही. थोड्याफार प्रमाणात नाराजी असते, ती दूर होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्षचिन्हावरून वाद सुरू आहे. मात्र आज शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार आहेत, खासदारही त्यांच्याकडे अधिक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

रामदास आठवलेंचे अजित पवारांना आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही, अशी घणाघातील टीका आठवले यांनी केली. अजित पवारांना पहाटेची शपथ घेण्याची सवय आहे. कदाचित अजित पवार युती सरकार मध्ये येत असतील. अजित पवार आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे रामदास आठवले म्हणाले. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देण्याचं एकनाथ शिंदे यांच्यात सामर्थ्य आहे. टपरीवाले असे हिनवल्या जाणाऱ्या गुलाबराव पाटलांनी शिवसेनेला चुना लावल्याचेही आठवले म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा?आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून निर्णय घेतील- बाळासाहेब थोरात

Latest Posts

Don't Miss