spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या रॅलीला सुरवात

आजचा दिवस राजकरणासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. पंकजा मुंडे यांचा भगवान गड येथे दसरा मेळावा पार पडणार आहे तर दुसरी कडे शिवसेनेत फूट पढल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई मध्ये शिवसेनेचे २ दसरा मेळावे होणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला असून, बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे (pritam munde) यांच्या नेतृत्वात गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड रॅलीला सुरवात झाली आहे. यावेळी ठीक-ठिकाणी प्रितम मुंडे यांचे स्वागत केले जात आहे. सकाळी सहा वाजता प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. गोपीनाथ गडावरून निघालेली रॅली सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव अशी असणार आहे. तर यावेळी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत पाहायला मिळत आहे.

या मेळाव्यात पंकजा मुंडे भाषणात काय बोलणार या कडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मी बेरोजगार असल्याचं विधान केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता आमचे बहिण-भावाचे नातं राहिलं नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तसेच पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचे विधान सुद्धा अनेकदा होतच असतात, यावर सुद्धा पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सुद्धा पंकजा मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीसाठी निघालेल्या प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, दरवर्षी आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरवात करतो आणि कार्यकर्ते तेथून सोबत यायला सुरवात होते. मात्र यावर्षी थेट घरून निघतानाच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत असल्याने यावर्षी प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं प्रितम मुंडे म्हणाल्यात.

हे ही वाचा:

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, मेळाव्यासाठी जाणाऱ्या गाड्यांचा अपघात ५ ठार

दसरा मेळाव्यामुळे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss