Sunday, September 29, 2024

Latest Posts

जम्मू-काश्मीरच्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन आणि एका स्थानिक दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. शोपियन जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय लष्कराला हे यश मिळालं. द्राच परिसरात एक चकमक सुरु असून, मुलू येथेही भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे.सुरक्षा जवानांनी द्राच परिसरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर मुलू येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सहभागी होते.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत २ घुसखोर आणि १४ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादीही होता. यापैकी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन आणि चित्रगाम गावात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये ३, अनंतनाग आणि कुलगाममध्ये प्रत्येकी २ आणि श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक चकमक झाली. कुपवाड्यात दोन दहशतवादी मारले गेले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीवर दौऱ्यावर असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून राजौरी जिल्ह्यात त्यांनी एका सभेला संबोधित केलं. अमित शाह यांनी दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. बुधवारी ते बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील द्राच भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला तेव्हा शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.

हे ही वाचा:

महिलांना निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यासह सक्षम करण्याची गरज: दसरा कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,बस दरीत कोसल्याने २५ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss