spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दसरा मेळाव्या आधीच ठाकरेंना धक्का, आज दोन खासदारांसह पाच आमदार शिंदे गटात सामील होणार

आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वपूर्ण दिवस ठरणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन दसरा मेळावा आयोजित करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी ला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा होणार आहे. दोनी गटाकडून जोरदार जय्य्त तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का देणारा असल्याचा दावा केला आहे. बीकेसी (BKC) मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळं ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते अशी राजकीय वर्तळात चर्चा सुरु आहे.

शिंदे गटातील खासदार कृपाल तुमानेंचा आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा केला आहे. हा दावा ठाकरेंनीसाठी धक्कादायक मानला जात आहे. कारण आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार आले आहेत. पुन्हा आणखी जर पाच आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला तर हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. आज प्रवेश करणाऱ्या दोन पैकी एक खासदार मुंबईचा आणि एक मराठवाड्याचा असू शकतो. एक प्रभावी खासदार आज शिंदे गटात प्रवेश करु शकतो असे तुमाने यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय पाच आमदार शिंदे गटात येतील असा दावा देखीलतुमाने यांनी केला आहे.

मोठ्या संख्येने शिवसेनेचे लोकप्रतिनिधी शिंदे गटात आधीच आले आहे. त्यामुळं हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे. बाळासाहेबांचा विचार घेऊन समोर जाणारी शिवसेना आहे. ज्यांनी शिवसेनेला सदैव शिव्या दिल्या आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही. शिवसेनेच्या दुर्देशेला आम्ही जबाबदार नाही असे देखील तुमानेंनी म्हटलं आहे. शिंदे यांच्यासोबत राज्यातील ५० आमदार आणि १२ खासदार आले आहेत. जनता शिंदे साहेबांच्या सोबत असल्याचे तुमाने म्हणाले. आमचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊस जनतेसमोर जात असल्याचे तुमाने म्हणाले. कोणते खासदार आणि आमदार शिंदे गटात जाणार याबाबत तुमानेंना विचारल्यावर ते म्हणाले की, यामध्ये एक मराठवाड्यातील खासदार आणि एक मुंबईतील खासदार असू शकतो असे तुमानेंनी सांगितले.

हे ही वाचा:

सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

घरातील एलईडी टीव्हीचा स्फोट झाल्याने गाझियाबादमधील तरुणाचा मृत्यू, दोन जखमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss