spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार,…. -: मनसे नेत्याचे ट्विट

आज महाराष्ट्र मध्ये राजकारण दृष्टीने महत्वाचा दिवस मानला जात आहे. इतिहासात कधी घडलं नाही ते घडणार आहे. मुंबई मध्ये शिवसेनेचे दोन मेळावे आज होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा. आता माणसे कडून सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधण्यात आला आहे. “मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फु…” असं म्हणत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर मनसे नेत्याने हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

 काय आहे ट्विट?

“टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू…” असं म्हणत खाली एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये हसऱ्या मेळाव्याची तयारी सुरू असं म्हटलं आहे.

गजानन काळे यांनी केलेल्या ट्विटमध्ये “साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील? त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्याचीच तयारी सुरू आहे. डिस्टर्ब करू नका असं म्हटलं आहे. तसेच टोमणे बॉम्ब, पाठीत खंजीर कोथळा बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब” असं देखील म्हटलं आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसऱ्या मेळाव्यातून कोणावर निशाणा साधणार हि उत्सुखता सगळ्यांनाच लागली आहे. एकीकडे बंडखोर आमदार खासदार, दुसरी कडे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने (माणसे). काही दिवसांपूर्वी झालेल्या नेसको येथल्या गट प्रमुख मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

हे ही वाचा:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह दिल्लीत ‘प्रभास’ करणार रावण दहन

IND vs SA : तिसरा T२० सामना हरल्यानंतर रोहितनं संघाविषयी दिली प्रतिक्रिया म्हणाला- ‘बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss