spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हिमाचलमधील बिलासपुर येथे ७५० खाटांच्या आधुनिक AIIMS चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या एम्सची पायाभरणीही केली होती आणि आज म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी या रुग्णालयाचे उद्घाटनही केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे १४७० रुपये खर्चून बांधलेल्या एम्स (AIIMS) चे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या एम्सची पायाभरणीही केली होती आणि आज म्हणजे बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी या रुग्णालयाचे उद्घाटनही केले आहे. हे रुग्णालय प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहे.

बिलासपूर एम्समध्ये १८ स्पेशालिटी आणि १७ सुपर स्पेशालिटी विभाग आहेत. याशिवाय, हॉस्पिटलमध्ये १८ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, ७५० बेड आणि ६४ आयसीयू बेड आहेत. हे संपूर्ण रुग्णालय २४७ एकर जागेवर बांधले असून रुग्णालयात २४ तास आपत्कालीन सुविधा आहेत. डायलिसिस, अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय अशा आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

हॉस्पिटलमध्ये अमृत फार्मसी आणि जन औषधी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे आणि बिलासपूर एम्समध्ये ३० खाटांचा आयुष ब्लॉकही तयार करण्यात आला आहे. या रुग्णालयात दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी तर दरवर्षी ६० विद्यार्थ्यांना नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

यासोबतच ३६५० कोटींहून अधिक किमतीच्या विकास योजनांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यानंतर ते बिलासपूरच्या लुहनू मैदानावर जातील आणि अनेक विकास योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. एवढेच नाही तर ते येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. दुपारी ३.१५च्या सुमारास पीएम मोदी कुल्लूच्या धालपूर मैदानावर पोहोचतील आणि कुल्लू दसरा कार्यक्रमात सहभागी होतील.

हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय नेते येत्या काही दिवसांत हिमाचलच्या दौऱ्यावर असणार आहेत.

हे ही वाचा:

“मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार,…. -: मनसे नेत्याचे ट्विट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालसह दिल्लीत ‘प्रभास’ करणार रावण दहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss