spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सबा आझादने सोशल मीडियावर शेअर केली तिच्या नव्या चित्रपटाची झलक

सबाने तिच्या आगामी 'सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून, या चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर करून त्याबाबत माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) तिच्या पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे. ऋतिक रोशनसोबत सबा आझाद अनेकदा फिरताना दिसते. इतकेच नाही तर हे दोघे रिलेशनमध्ये (Relation) असल्याच्या देखील चर्चा आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या रिसेप्शनला ही सबा आणि ऋतिकनेसोबतच हजेरी लावली होती. अनेकदा हे परदेशात देखील फिरायला जातात. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) एका मुलीला डेट करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी पुढे आल्या होत्या. मात्र, नंतर समजले की, ही दुसरी तिसरी कोणी नसून ही सबा आझाद आहे.

सबाने तिच्या आगामी ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून, या चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर करून त्याबाबत माहिती दिली आहे. चित्रपट निर्माते दानिश रेन्झू यांच्या या चित्रपटात सबा एका काश्मिरी गायिकेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दानिश रेंजूच्या ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज’ या चित्रपटात सबा आझाद मुख्य भूमिकेत आहे. काश्मिरी कलाकारांच्या कथेवर आधारित या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सबाने जेव्हा या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली, तेव्हा चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह चाहते अभिनेत्रीचे जोरदार कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

सबा आझादने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात साबा काश्मिरी पारंपारिक पोशाखात स्टेजवर माईकसमोर उभी असलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत सबाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आर हा एक स्पेशल चित्रपट आहे आणि स्पेशल कॅरॅक्टरचा रैप आहे. Songs Of Paradise माझ्या हृदयाचा ठाव घेतला आहे. आम्ही काय केलय हे पाहण्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करू शकत नाही.”

हे ही वाचा:

दसरा मेळाव्याआधीच रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हिमाचलमधील बिलासपुर येथे ७५० खाटांच्या आधुनिक AIIMS चे उद्घाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss