Sunday, September 29, 2024

Latest Posts

‘मी थकणार नाही मी झुकणार नाही… ‘, मेळाव्यात पंकजा मुंडेंची तोफ कडाडली

शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपआपल्या दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यामध्ये खासदार प्रितम मुंडेही उपस्तिथ आहेत. पंकजा मुंडे यांचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित आहेत.

हेही वाचा : 

दसरा मेळाव्याआधीच रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर…

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा दसरा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. स्व. मुंडे साहेबांच्या विरोधकांनी पातळी सोडून माझ्यावर टीका केली. परंतु मी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. ते माझ्या रक्तात नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी द्यायला खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही. ती माझी ऐपत नाही. तुम्ही मला सांभाळून घेताय, ही मोठी गोष्ट आहे. संघर्षाशिवाय नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली.” असे मुंडेंनी म्हटले.

गर्दी माझी शक्ती आहे. हेच जे.पी. नड्डांनी मला सांगितलं. मी फक्त गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलजींचा, प्रमोदजींचा नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवते. मी शत्रुविषयी वाईट बोलत नाही तर माझ्याविषयी वाईट बोलणारांवर टीका कशी करेल’ असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

IND vs SA : तिसरा T२० सामना हरल्यानंतर रोहितनं संघाविषयी दिली प्रतिक्रिया म्हणाला- ‘बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे’

हेही वाचा : 

दसरा मेळाव्याआधीच रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर…

Latest Posts

Don't Miss