Sunday, September 29, 2024

Latest Posts

पंकजा मुंडेंच्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

पोलिसांकडून त्यांना आवरण्याचं प्रयत्न झाला, मात्र कार्यकर्ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी या उत्साही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं समोर येत आहे.

महाराष्ट्रातील शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दसरा मेळाव्यावतिरिक्त अजून एक महत्तवाचा दसरा मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांनी घेतलेला सावरगाव येथील भगवान गडावर घेतलेला मेळावा. आज पंकजा मुंडेंनी त्याच्या या दसऱ्या मेळाव्यात जोरदार भाषण केलं. तसेच या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप गर्दी केली होती आणि याच गर्दीमुळे मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ पहायला मिळायला.

पंकजा मुंडेंच्या या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. ज्यावेळी पंकजा मुंडे या भाषणासाठी व्यासपीठावर दाखल झाल्या त्यानंतरही काही हुल्लडबाज तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. भाषण सुरु करण्यापूर्वी व्यासपीठावर आल्यावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना शांत होण्याचे आवाहन केले. पंकजा मुंडेंचं भाषण संपेपर्यंत कार्यकर्ते शांत राहिले. मात्र, जेव्हा त्या व्यासपीठावरुन खाली उतरुन आपल्या ताफ्याकडे गेल्या त्यानंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ पुन्हा सुरु झाला आणि जमा झालेल्या काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. पोलिसांकडून त्यांना आवरण्याचं प्रयत्न झाला, मात्र कार्यकर्ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी या उत्साही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचं समोर येत आहे.

सुमारे आठ ते दहा मिनिटं हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळानं आणखी पोलीस कुमक तिथं बोलवावी लागली. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली. सुरुवातीला खासदार प्रितम चव्हाण यांनी देखील समर्थकांना भागवान बाबांची शांततेची शिकवण असल्याचं सांगत शांत राहण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही काही उत्साही कार्यकर्ते शांत राहण्याच्या मनस्थितीत नव्हते.

हे ही वाचा:

भारतीय फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर आणि प्रतीक सिन्हा नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत

खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत- संभाजी भिडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss