Sunday, September 29, 2024

Latest Posts

शिंदे गटाला धक्का, मुंबईत कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आज महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्टितने महत्वपूर्ण दिवस आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी येथे सभा घेणार आहेत तर दुसरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहे. मुंबईमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे या मेळाव्यांची सर्वांना उत्सकता लागली असताना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.

यवतमाळ येथून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीकृष्ण मांजरे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. यवतमाळ ते मुंबई या प्रवासादरम्यान कार्यकर्त्याचं निधन झालं आहे. बहुप्रतीक्षित असलेला राज्यातील शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा आज संध्याकाळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून केलीय. या मेळाव्याला राज्यभरातून ३ लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलाय. यासाठी बस ट्रेन बूक करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी जेवण आणि इतर सोई यांच नियोजन करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

मुकेश आणि नीता अंबानी कुणी दिली जीवे मारण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरु

शिंदे गटांकडून शिवसैनिकांचा खास पाहुणचार, BKC मैदानावर कोणत्या सुविधा उपलब्ध?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss