Sunday, September 29, 2024

Latest Posts

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी महत्वाची बातमी, सुरक्षेच्या दृष्टीने स्क्रिनशॉट काढता येणार नाही त्या ऐवजी…

आजच्या काळात बहुतांश लोकांच्या या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सापडेल. WhatsApp हे एक चॅटिंग अॅप आहे जे लोकांच्या गरजेचा भाग बनले आहे अशातच आता व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. आता तुम्हाला स्क्रिनशॉट (Screenshot) काढता येणार आहे. कंपनी व्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट काढण्यावर बंदी आणण्याच्या विचारात आहे. यासाठी आता कंपनीकडून नवीन फिचरची तपासणी सुरु आहे. अनेक दिवसांपासून या फिचरची मागणी करण्यात येत होती. हे फिचर आल्यास युजर्सना एकदा पाहामध्ये पाठवलेल्या फोटो किंवा व्हिडीओचा स्क्रनशॉट काढता येणार नाही अशा पद्धतीचे असणारा आहे.

हेही वाचा : 

Dasara Melava : नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप

व्हॉट्सॲपने गेल्या वर्षी स्नॅपचॅट सारखं फिचर आणलं आहे. यामध्ये युजर्सना एक मीडिया एकदा पाहण्याची परवानगी असते. मात्र या फिचरमध्ये त्रुटी आहेत, कारण युजर्स हा वन टाईम मीडियाचे स्क्रिनशॉट काढू शकतात. ज्यामुळे या फीचरच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर आता यावर उपाय म्हणून स्क्रिनशॉट घेण्यावर बंदी आणणार आहे.

व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच जाहीर केलं आहे की कंपनी व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचरवर काम करत आहे. यामध्ये युजर्सच्या स्क्रीनशॉट घेण्यावर बंदी येईल. सध्या बीटा वापरकर्त्यांसाठी हे फिटर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे की, ‘आम्ही युजर्सच्या मेसेजचं संरक्षण करण्यासाठी आणि ते खाजगी तसेच सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू.’

‘मी थकणार नाही मी झुकणार नाही… ‘, मेळाव्यात पंकजा मुंडेंची तोफ कडाडली

Latest Posts

Don't Miss