Sunday, September 29, 2024

Latest Posts

Dasara Melava : मुख्यमंत्री शिंदे हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून व्यक्त झाले, नकळत ठाकरेंवर निशाणा

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज मुंबईकडे आहे. मुंबईमध्ये आज दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमधून दोन्ही गटांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय तर, उद्धव ठाकरे हे दादरमधील शिवाजी पार्कवरुन पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळाव्यातून आपलं मत मांडणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांची उत्सुकता शिगेला पोहचेलली असतानाच मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच ट्विट करत नकळत शिवसेनेला चिमटा काढला आहे.

हेही वाचा : 

राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव आता हे असणार …

” मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ” प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केली आहे. त्याचबरोबर शिंदेंनी नवा टीझर शेअर केला आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचं तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” या कॅप्शनसहीत हा टीझर शेअर केला आहे. चला बीकेसी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. हिंदुत्वाच्या सन्मानाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दसरा मेळावा. आपल्या अभिमानाचा शिवसेनेचा दसरा मेळावा, असा मजकूर या टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे वारकरी, भांगडा करणारे पंजाबी बांधव, दाक्षिणत्य कला सादर करणारे कलाकार यासारखी दृष्य या टीझरमध्ये दिसत आहेत.

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी महत्वाची बातमी, सुरक्षेच्या दृष्टीने स्क्रिनशॉट काढता येणार नाही त्या ऐवजी…

आता काहीच क्षणात शिंदे आणि ठाकरे गटातीचा दसरा मेळावा सुरु होणार आहे. याप्रसंगी शिंदे आणि ठाकरे काय भाषण करतील याकडे संपूर्ण राज्यच लक्ष आहे.

Latest Posts

Don't Miss