Sunday, September 29, 2024

Latest Posts

शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकाला अश्रू अनावर; शिंदेगटाने उद्धव ठाकरेंवर अन्याय केल्याचा केला दावा

साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय

शिवसेनेत फूट पडल्यामुळे यावर्षी प्रथमच शिवसेना विरुद्ध शिंदेगट अशी जुगलबंदी दसरा मेळव्याच्या माध्यमातून पाहता येणार आहे.दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थवर तर शिंदेगटाचा मेळावा हा बीकेसी मैदानात घेण्यात येणार आहे. दसरा मेळाव्यासाठी दोन्हीकडून जय्यत तयारी सुरु आहे. दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरिता आलेल्या अशाच एका दिव्यांग शिवसैनिकाला प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले आहेत.

‘मी निझामाबादहून आलोय. साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय. मी शिवसैनिक आहे साहेबांचा….साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलोय. मी दरवर्षी येत असतो, असं म्हणत दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले.

तर, ‘गट-वगैरे जे काही म्हणताय तो शिंदे गटाचा आहे. आता आमच्यामधून गद्दार निघून गेले आहे. आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक उरले आहे. पुढचा मुख्यमंत्री हा आमचाच होणार आहे. आम्ही आता कामाला लागला आहे, असंही शिवसैनिकांनी ठणकावून सांगितलं.

जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक रेल्वेने मध्यरात्री मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले. जळगाव स्टेशनला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी निघाले आहेत. रेल्वेने मुंबईकडे निघालेल्या शिवसैनिकांनी गाडीमध्येच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत ‘उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा:

जरूर त्यांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा, पण ……; अजित पवार यांनी ठाकरे आणि शिंदे यांना खडसावले

Dasara Melava : मुख्यमंत्री शिंदे हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून व्यक्त झाले, नकळत ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss