spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टाईम महाराष्ट्र आयोजित ‘सुंदर माझा बाप्पा’ स्पर्धा २०२२ निकाल जाहीर

यंदा तब्बल दोन वर्षांनी प्रशासनाच्या परवानगीने नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. कोरोनामुळे सण साजरे करण्यास निर्बंध घेण्यात आले होते.

यंदा तब्बल दोन वर्षांनी प्रशासनाच्या परवानगीने नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. कोरोनामुळे सण साजरे करण्यास निर्बंध घेण्यात आले होते. मात्र यंदा महाराष्ट्रासह देशभरात भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा इथ पासून ते ढोल ताशा पथकापर्यंत कोणतीही बंधन असल्याने अगदी दोन वर्षांची कसर यंदा भरून काढल. याच निमित्ताने टाईम महाराष्ट्र कडून सुंदर माझा बाप्पा’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा आरंभ ३१ ऑगस्ट २०२२ रोजी झाला. त्यानंतर शेवटचा दिवस १५ सप्टेंवबर २०२२ होता. तर आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘सुंदर माझा बाप्पा’ या स्पर्धेचा निकाल जाहीर होत आहे.

‘टाईम महाराष्ट्र’ ‘सुंदर माझा बाप्पा’ आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून निकाल जाहीर केला आहे. स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक स्वदेशी सजावटीला महत्व देण्यात आले. ही स्पर्धा खुली आणि ऑनलाइन पद्धतीने असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सांगली, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली, रत्नागिरी आदी अनेक शहरे आणि दापोली तालुक्यातील विविध गावांतील एकूण ५७ जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

या स्पर्धेत सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपती बसवणाऱ्या भाविकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. अनेकांनी खूप सुंदर पद्धतीने सजावट केली होती तर काहींनी चलचित्राचे प्रदर्शन केले होते फळा फळांची आरास त्याचबरोबर सुबक आणि सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती याचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही टाईम महाराष्ट्राच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला टॅग केलं. एकूण ५७ जणांनी या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे पहिले तीन नंबर काढण्यास परीक्षकांना कठीण झाले. परंतु स्पर्धेच्या अटी आणि नियम पाहता अखेर परीक्षकांनी पहिले तीन नंबर घोषित केले आहेत. निकाल वाचण्यासाठी नक्कीच तुम्ही उत्सुकता असाल.

  • ‘टाईम महाराष्ट्र’ आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा तिसरा क्रमांक प्रतिक सुहास निकम यांनी पटकावला आहे. त्यांनी चाळीत विराजमान असलेले गणपती बाप्पाचे सुंदर डेकोरेशन केले होते.
  • टाईम महाराष्ट्र आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा दुसरा क्रमांक पटकावला आहे धीरज दत्तात्रय पत्की यांनी डमरू वाजवणाऱ्या गोंडस बाल गणेशाचे स्वागत करत कैलास पर्वत असे डेकोरेशन केले आहे.
  • अखेर टाईम महाराष्ट्र आयोजित सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा पहिला क्रमांक पटकावण्याचा मान मिळाला आहे बाळासाहेब रावसाहेब नवले यांनी हुबेहूब गोवर्धन पर्वताचे डेकोरेशन केले आहे.

उर्वरित स्पर्धकांनी देखील उत्तम सजावट करून या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल ‘टाईम महाराष्ट्र’ तर्फे सर्वांचे आभार… !

Latest Posts

Don't Miss