बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यामुळे सुष्मिता सेन चर्चेत होती. आता सध्या सुष्मिता देखील प्रकाशझोतात आली आहे. एका आगामी चित्रपटातील सुष्मिताचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सुष्मिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
काही वर्षांपूर्वी ‘विक्स’ कंपनीच्या जाहिरातीतून एक तृतीयपंथी समोर आली. ती म्हणजे गौरी सावंत. एका तृतीयपंथीयाच्या आयुष्याचा संघर्ष, त्यांचं म्हणणं या जाहिरातीतून जगासमोर आलं आणि गौरी सावंत हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर गौरीने भोगलेलं दुःख, तिचा संघर्ष, कुटुंबाकडून झालेली अवहेलना, वेळप्रसंगी करावा लागणारा वेश्याव्यवसाय हे सारंच जगासमोर आलं. आज हाच संघर्ष वेब सिरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे. ”टाली” असं या वेबन सिरिजचे नाव असून मराठी दिग्दर्शक रवी जाधव ही वेब सिरिज दिग्दर्शित करणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री सुश्मिता सेन गौरी सावंतची म्हणजे तृतीयपंथीयांची भूमिका साकारणार आहे. आजवर तृतीयपंथीयांचा अभिनय पुरुष अभिनेत्यानेच केलेला आपण पाहिला आहे. पण पहिल्यांदाच एक अभिनेत्री तृतीय पंथीयाची भूमिका करणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या आगामी वेब सीरिजमधील फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. तिचा लूक पाहून ती सर्वस्तरातून तिचे कौतुक होत आहे. आता ‘गौरी सावंत’ साकारणे हे सुश्मिता साठी मोठे आव्हान असणार आहे.
सुष्मिता सेननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुष्मितानं तिच्या आगामी चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुष्मितानं कॅप्शन दिलं, ‘ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ‘ साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले.
गौरी सावंत या ऍक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या ९ व्या सिझनमध्ये देखील गौरी यांनी हजेरी लावली होती. सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये ‘आर्या’ वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. या सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हे ही वाचा:
Scooby – Do मधील वेल्मा समलैंगिक दाखवताच अशा नेटकऱ्यांनी दिल्या या प्रतिक्रिया
बॅालीवूडलाही ‘महासत्तांतर’ची भुरळ, राम गोपाल वर्मा अॅक्शन मोडमध्ये