spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भारतीय कुटुंबातील ४ जणांच्या अपहरणाचा व्हिडिओ आला समोर

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे अपहरण करण्यात आले आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एका आठ महिन्यांच्या मुलीसह भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी चेतावणी दिली आहे की संशयित सशस्त्र आहे आणि तो धोकादायक आहे. कॅलिफोर्नियातील मर्सिड काउंटीमध्ये सोमवारी सेंट्रल व्हॅलीमधील एका कुटुंबाचे अपहरण करण्यात आले. आठ महिन्यांची आरुही ढेरी, तिची आई जसलीन कौर (२७), वडील जसदीप सिंग (३६) आणि काका अमनदीप सिंग (३९) अशी या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

शेरीफ पोलिसांनी त्यांना अपहरणकर्ता वाटत असलेल्या माणसाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्याने संशयिताची ओळख पटवून देताना सांगितले की अपहरणकर्त्यांने हुडी (टी-शर्टला जोडलेली टोपी) घातली होती. सोमवारी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले की आठ महिन्यांच्या मुलीचे आणि तिच्या पालकांचे सशस्त्र आणि धोकादायक समजल्या जाणार्‍या व्यक्तीने अपहरण केले होते. कुटुंबातील एका नातेवाईकाचेही अपहरण करण्यात आले आहे.

“मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही खंडणीची मागणी करण्यात आलेली नाही,” असे शेरीफ कार्यालयाने सांगितले. आम्हाला तुमची मदत हवी आहे. आम्ही संशयिताला सशस्त्र आणि धोकादायक मानतो. शेरीफ वारणेके म्हणाले, ‘या घटनेमागचे कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. त्याचे अपहरण झाले आहे एवढेच आम्हाला माहीत आहे. संशयिताबद्दल काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेरीफच्या कार्यालयातून फेसबुक पोस्ट शेअर करून या घटनेची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

मुंबई-गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा झाला अपघात, इंजिनचे झाले नुकसान

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss