spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Google Pixel 7 Series Launch: मेगा इव्हेंटमध्ये गूगलने लॉन्च केले Google Pixel 7, Pixel 7 Pro, जाणून घ्या गूगलच्या नव्या सिरिजची किंमत आणि वैशिष्टय

महत्वाचं म्हणजे यातील "गाइडेड फ्रेम" या वैशिषट्यामुळे नेत्रहीन वापरकर्तेसुद्धा हा स्मार्टफोन सहज वापरून फ्रेम ॲडजस्ट करून सेल्फी क्लिक करू शकतात.

एका मेगा इव्हेंटमध्ये गुगलने ( Google) त्यांच्या बहुप्रतिक्षित स्मार्टफोन सिरिजचे Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro लॉन्च केले आहेत. या दोन स्मार्टफोन्ससह गुगलने ( Google) त्यांचे इतर काही प्रॉडक्टससुद्धा लॉन्च केले आहेत. ज्यात स्मार्टवॉच आणि ईयरबड्सचा समावेश आहे.

Google Pixel 7, Pixel 7 Pro ची वैशिष्ट्य

Google Pixel 7

६.३-इंच FHD+ स्क्रीन
९०Hz रिफ्रेश रेट
७२ तासांचा बॅटरी बॅकअप

Google Pixel 7 Pro

६.७-इंच QHD+ LTPO स्क्रीन
१२०Hz रिफ्रेश रेट सपोर्ट
ट्रिपल रियर कैमरा सेटअप
७२ तासांचा बॅटरी बॅकअप

नक्की किती आहे Google Pixel 7, Pixel 7 Pro ची किंमत

Google Pixel7 या गुगल स्मार्टफोनची किंमत $५९९ म्हणजेच जवळपास ४९,१९८ रुपये आहे तर Pixel 7 Pro या स्मार्टफोनची किंमत $८९९ म्हणजेच जवळपास ७३, ८३९ रुपये इतकी आहे.

शानदार कॅमेरा क्वालिटी

Google Pixel 7 वापरकर्त्यांना उत्तम कॅमेरा एक्सेसिबिलिटी प्रदान करते. महत्वाचं म्हणजे यातील “गाइडेड फ्रेम” या वैशिषट्यामुळे नेत्रहीन वापरकर्तेसुद्धा हा स्मार्टफोन सहज वापरून फ्रेम ॲडजस्ट करून सेल्फी क्लिक करू शकतात. उत्तम कॅमेरा क्वालिटीशिवाय Google Pixel 7 सीरिजमध्ये सिनेमैटिक ब्लर वीडियो फीचरदेखील आहे. ज्यामुळे सब्जेक्टवर फोकस करून बॅकग्राऊंड ब्लर करून व्हिडिओ काढता येईल. Pixel 7 मध्ये झूम फीचर अजून सुधारित रुपात वापरकर्त्यांसमोर आणण्यात आले आहे. सुपर रेस २x झुमसाठी ५०MP कॅमेरासह १२.५ मेगापिक्सल इमेज देखील देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जागतिक बँकेने भारताचा विकास दर ६.५% पर्यंत घटवला, जाणून घ्या ह्यामागची कारणे

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये भारतीय कुटुंबातील ४ जणांच्या अपहरणाचा व्हिडिओ आला समोर
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss