spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात ठाकरे – शिंदेंचा सामना

राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील दसऱ्या मेळावामधील लढाई अख्तर संपली परंतु या दोन्ही गटात अजून हि सत्तासंघर्ष चालू आहेत.

राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील दसऱ्या मेळावामधील लढाई अख्तर संपली परंतु या दोन्ही गटात अजून हि सत्तासंघर्ष चालू आहेत. दसरा मेळावानंतर त्यांची पुढची लढाई ही आता सुरु होणार आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे आणि शिंदे गटातली (Shinde Group) पुढची लढाई शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर आता धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आज आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आज दुपारी १ वाजता आपलं प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर ही आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावा अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा नसतानाही अंधेरी (पूर्व) मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपल्या गटाच्या वतीने उमेदवारी दाखल करीत आहेत. त्यामुळे निवडणूक चिन्हांबाबत असलेला वाद निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणीस घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हे ही वाचा:

Arun Bali Death : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

राज्यात २५ लाख हेक्टर जमीन… : देवेंद्र फडणवीस

NTSE Scheme : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss