spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Adipurush : ‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, तर मनसेने दिला पाठिंबा

भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे.

“आदिपुरुष’ सिनेमाची टीम आणि ओम राऊतच्या मागे मनसे खंबीरपणे उभी आहे. ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ सारखे सिनेमे ओमने बनवले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. राज्यातल्या सिनेमा समजणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे, 95 सेकंदच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा बांधता? आधी सिनेमा पाहा” असे देखील अमेय खोपकर म्हणाले आहे. तसेच मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट केलं आहे,”ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे”.

 अमेय खोपकर पुढे म्हणाले आहेत,”ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’च्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे”.

भाजपचे नेते रॅम कदम यांनी ट्विट करत विरोध दर्शवला – 

 आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटावर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी टीका केली. ‘हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.’ असं ट्वीट राम कदम यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. आदिपुरुष या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. ‘चित्रपटाची दृष्य कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही.’ असही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिलं. आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत.

हे ही वाचा:

Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात ठाकरे – शिंदेंचा सामना

Arun Bali Death : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

NTSE Scheme : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss