spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळी का साजरी केली जाते ? घ्या जाणून

हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी दिवाळी हा सण आहे. दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा सण होय. भारतात दिवाळी हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळे, फटाके, कपडे आलेच. तसेच दिवाळीची सुरुवात २४ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे.

हे ही वाचा : Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात ठाकरे – शिंदेंचा सामना

 

दिवाळी का साजरी केली जाते –

महाभारत काळात श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी दिवे प्रज्वलित करून आनंद व्यक्त केला, अशी कथा सांगितली जाते. दिवाळीनिमित्त देवीच्या रौद्ररूपाची पूजा करण्याचीही प्रथा आहे. भगवान विष्णूने वामन रूपात बळीराजाकडून त्रैलोक्य घेतले. त्यानिमित्त लोकवासी दरवर्षी दिवाळी साजरी करतील, असे विष्णूंनी सांगितल्याचे मानले जाते.थोडक्यात, वेगवेगळ्या निमित्ताने अनेकांसाठी दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा, नावीन्याचा सण आहे. सहकुटुंब एकत्र येण्याचा, गोड, तिखट, चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा, शुभेच्छांसह भेटवस्तूंची देवाण-घेवाण करण्याचा उत्सव आहे. दिव्यांच्या तेजाने आणि आपल्या माणसांच्या सहवासाने, प्रेमाने न्हाऊन निघण्याचा सुंदर दिवाळ सण आहे.

 

धनत्रयोदशी –

दिवाळीची सुरुवात हि धनत्रयोदशी ने होते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करतात आणि ते शुभ मानले जाते. प्रत्येक जण आपले घर दिव्यांनी सजवतात. धनत्रयोदशी धनाची पूजा केली जाते. धन देवीची पूजा केली जाते.

नरकचतुर्दर्शी –

नरकतुर्दशी छोटी दिवाळी म्हणून साजरी करण्यात येते. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर वेगवेगळ्या पद्धतीने सजवतात . महिला हातांवर मेहंदी काढतात. लहान मुलांना चांगला उपहार दिला जातो.

लक्ष्मीपूजन –

दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस ज्याला आपण दिवाळी असे हि म्हणतो. आणि त्यादिवशी मोठ्या थाटामाटात लक्ष्मीपूजन केले जाते. आणि रांगोळ्या दिवे लाऊन घरे सजवली जातात. लक्ष्मीपूजनचा दिवशी पैसे, मिठाई, पुस्तके यांची पूजा केली जाते. आणि आरोग्यासाठी आणि घराच्या सुखी साठी पूजा केली जाते. आणि त्यादिवशी एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात. आणि दुकानामध्ये , ऑफिस मध्ये देखील लक्ष्मीपूजन केले जाते.

पाडवा –

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित लोक एकमेकांना छानसे गिफ्ट देवून खुश करतात.

भाऊबीज –

दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊ-बहिणीच्या नात्यांचा असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भरपुर शुभेच्छा देते. हा दिवस रक्षाबंधन सारखाच खास दिवस मानला जातो.

हे ही वाचा :

IND vs SA : श्रेयस अय्यने अर्धशतक ठोकून एक विशेष कामगिरी केली, अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा खेळाडू

 

Latest Posts

Don't Miss