Monday, September 30, 2024

Latest Posts

डोळ्यांची दृष्टी कमी होत चाली आहे , तर हे घरगुती उपाय करा…

जर तुम्हाला गोष्टी पाहण्यात त्रास होत असेल तर डोळ्यांची दृष्टी कमी होत चाली आहे. डोळयांची समस्या आजकाल खूप वाढताना दिसत आहे. आजकालच्या डिजिटल स्क्रीनचा जास्त वापर होत असल्याने डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. फोन , टीव्ही , कॉम्प्युटर , लॅपटॉप , यांचा वापर आजकाल खूप वाढत चाला आहे . त्यामुळे मोतीबिंदू यासारखे आजार होऊ लागले आहे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून डोळ्यांची दृष्टी वाढविण्याकरीता काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

हे ही वाचा : ८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

 

डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय –

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. आणि डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आवळा हा एक चांगला उपाय आहे. आवळ्यामध्ये एंटी-ऑक्सिडेंट्स असल्याने डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी मदत करते. तसेच आवळा हा एक आयुर्वेदी फळ आहे. याचा वापर फक्त डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी नाही तर केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील वापर होतो.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते. त्यामुळे पालक, कोबी, इत्यादी भाज्यांचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते. गाजर मध्ये बीट कॅरोटीन जास्त प्रमाणात असते. त्यासाठी गाजर खाणे खूप महत्वाचे आहे आणि दृष्टी देखील वाढण्यास मदत होते.

 

बदाम, मनुका आणि अंजीर हे देखील ड्रायफ्रुट्स जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. यामध्ये आढळणारे पोषक तत्व डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करते. बदाम रात्री पाण्यात भिजून ठेवणे आणि सकाळी उठून खाणे त्याचा खूप चांगला फायदा होतो.

त्या शिवाय तुम्ही वारंवार डोळे स्वच्छ करणे, डोळ्यांती घाण साफ करणे देखील गरजेचे आहे. याशिवाय डोळ्यांशी संबंधित काही व्यायामही करणे फार गरजेचे आहे. डोळे वर-खाली करणे, गोल फिरवणे. डोळ्यांना जर कधी खाज आली तर डोळे खाजू नका. जास्त खाज येत असल्यास कपड्यात पाणी थोडे शिंपडा आणि तो कपडा डोळ्यांना लावा.

हे ही वाचा :

चहासोबत ब्रेड खाणे आरोग्यास नुकसानकारक ठरू होऊ शकते

Latest Posts

Don't Miss