spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बेंगळुरूमध्ये ओला, उबेर, रॅपिडो ऑटो ठरवण्यात आल्या बेकायदेशीर; ३ दिवसात होणार सेवा बंद

एग्रीगेटर नियम फक्त कॅबसाठी आहेत. आम्ही त्यांना अॅपद्वारे ऑटोरिक्षा सेवा बंद करण्यास आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

कर्नाटक परिवहन विभागाने गुरुवारी एएनआय टेक्नॉलॉजी, राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार ओलाची (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडोच्या (Rapido) वाहनांना “बेकायदेशीर” म्हणत आणि तीन दिवसांत सेवा बंद करण्यास सांगण्यात आले आहे. वाहन जमा करणाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंतर दोन किलोमीटरपेक्षा कमी असले तरीही ओला आणि उबरवर किमान १०० रुपये आकारण्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी परिवहन विभागाकडे नोंदवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बेंगळुरूमध्ये किमान ऑटो भाडे पहिल्या २ किमीसाठी ३० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये निश्चित केले आहेत.

विभागाच्या सूचनेनुसार, राइड-हेलिंग कंपन्यांनी लवकरात लवकर त्यांची ऑटो सेवा बंद करावी आणि टॅक्सीमधील प्रवाशांकडून सरकारने ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारू नये, असे सांगण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

‘फक्त टॅक्सी चालवण्याचे दिले परवाने’

दरम्यान, परिवहन आयुक्त टीएचएम कुमार यांनी सांगितले आहे की त्यांनी या कंपन्यांना कर्नाटक ऑन-डिमांड ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी एग्रीगेटर नियम, २०१६ अंतर्गत फक्त टॅक्सी चालवण्यासाठी परवाने दिले आहेत. हा नियम रिक्षांना लागू होत नाहीत.

“टॅक्सी म्हणजे ड्रायव्हर सोडून सहा प्रवासी बसण्याची क्षमता असलेली मोटार कॅब, उपरोक्त नियमांचे उल्लंघन करून कंपन्या ऑटोरिक्षा सेवा देत आहेत. तसेच, सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर ग्राहकांकडून आकारले जात असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे,” असे वृत्तवाहन्यांशी बोलताना ते म्हणाले.

एल हेमंत कुमार, परिवहनाचे अतिरिक्त आयुक्त आणि राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव म्हणाले, “त्यांनी कॅब-एग्रीगेटर परवाना घेऊन ऑटोरिक्षा चालवायची नाही.” एग्रीगेटर नियम फक्त कॅबसाठी आहेत. आम्ही त्यांना अॅपद्वारे ऑटोरिक्षा सेवा बंद करण्यास आणि अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.”

आदर्श ऑटो ड्रायव्हर्स युनियनचे सरचिटणीस सी संपत म्हणाले की, अॅग्रीगेटर ऑटो सेवा बंद करण्याच्या योजनेचा ड्रायव्हर्सवर कोणताही परिणाम होणार नाही. “खरं तर, अॅग्रीगेटर ऑटोवाले प्रवाशांना पळवून लावत होते आणि आम्हालाही काम करू देत नव्हते. आम्हाला एग्रीगेटर्ससाठी नाही तर सामान्य राइड्ससाठी काम करण्याची परवानगी मिळाली आहे. एक युनियन म्हणून, आम्ही आधीच आमच्या सदस्यांना सरकारने ठरवून दिलेल्या भाड्यानुसार वाहन चालवण्यास सांगितले आहे.”

ओला, उबरला टक्कर देण्यासाठी ऑटो युनियन लॉन्च करणार मोबाईल अॅप्स

ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स युनियन (ARDU) आणि नंदन नीलेकणी-समर्थित बेकन फाऊंडेशन ही योजना सुरू करण्याची योजना आखत आहे.नम्मा यात्री अॅप १ नोव्हेंबर रोजी Ola आणि Uber सारख्या राइड-हेलिंग ॲप्सना टक्कर देत यावी यासाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

ARDU चे अध्यक्ष डी रुद्रमूर्ती यांनी सांगितले की अॅप-आधारित एग्रीगेटर ग्राहकांकडून किमान भाडे १०० रुपये घेतात आणि ६० रुपये चालकांना देतात आणि उर्वरित ४० रुपये कमिशन म्हणून घेतात. चालक ४० रुपयांत वाहनं चालवण्यास तयार आहेत. त्यांनी भाडे वाढवल्यानंतर ग्राहकांमध्ये ५०-६० टक्क्यांनी घट झाली. आणि त्यामुळे आम्हीसुद्धा ग्राहक गमावत आहोत, असेही ते म्हणाले.

“आमची युनियन १ नोव्हेंबरपासून नम्मा यात्री अॅप लाँच करण्याची योजना आखत आहे. आम्ही सरकारने निश्चित केलेल्या भाड्याचे पालन करू आणि पिक-अप शुल्क म्हणून अतिरिक्त १० रुपये वसूल करू. आम्ही मेट्रो स्टेशन आणि निवासस्थान/ऑफिस दरम्यान २ किमीच्या परिघात ४० रुपयांचे फ्लॅट भाडे सुरू करण्याचा विचार करत आहोत,” रुद्रमूर्ती यांनी सांगितले.

हे ही वाचा:

Bigg Boss 16: हिंदी बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, एमसी स्टॅनची शिव ठाकरेबाबत पर्सनल कमेंट

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीचा आजपासून थरार, दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss