spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात कोण आहे पप्पू?

'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पर्वातील स्पर्धक आणि त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काल 'चान्स पे डान्स' या उपकार्यात टीम A विजयी ठरली.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पर्वातील स्पर्धक आणि त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये काल ‘चान्स पे डान्स’ या उपकार्यात टीम A विजयी ठरली. आज बिग बॉसच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. तसेच या पर्वातील पहिलं कॅप्टन्सी कार्यदेखील पार पडणार आहे. शिवाय वेगवेगळे टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळे भलतीच रंगत येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व २ ऑक्टोबर रोजी सुरू झाले. रविवारी १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहे. आता बिग बॉस च्या घरात ‘पप्पू’ कोण आहे हे लवकरच उघड होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत कोणा एका सदस्यबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. या घरामध्ये काही दिवसांतच ग्रुप होतात आणि कट आखले जातात. आज असेच काहीसे होणार आहे. या चौघांच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरु आहे, ज्यात अपूर्वाचं म्हणणं आहे “माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे”. त्यावर अक्षय म्हणाला, चूक आहेस तू साफ सफाई देऊया… कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे ‘भांडी घाश्या’ बनवू त्याला. त्यावर अपूर्वा, रोहित त्यावर कंमेंट करतात..

अपूर्वा म्हणाते, ” हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो…” त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा असणारा हा पप्पू कोण आहे, कोण आहे हा ‘भांडीघाश्या’ हे आजच्या भागात कळेलच. याशिवाय सदस्यांमध्ये अजून काय काय चर्चा झाल्या ? कोण काय काय बोलं ? कोणाचे राडे झाले ? कोणी घरात धम्माल मस्ती केली? कसा पार पडला टास्क ? हे देखील आजच्या भागात कळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 चौथ्या पर्वातील पहिल्या साप्ताहिक कार्यात टीम A ने विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. तर कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले. त्यामुळे आता कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्याचे उमेदवार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

आजच्या भागात ‘बिग बॉस’ सदस्यांना सांगणार आहेत,”आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस, आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिले कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरु करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य”.

हे ही वाचा:

मकरंद अनासपुरेंचा ‘हा’ नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा म्हणाले, एकीकडे शेतकऱ्याचे जीवन कर्ज, दुःखाने भरलेले, तर दुसरीकडे…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss