spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धनुष्यबाण निश्चितपणे आम्हालाच मिळेल ; रामदास कदम

शिवसेनेच्या फुटी नंतर पहिल्यांदाच दोनी गटा कडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. तो वाद संपतोयच तर आता पुन्हा पक्ष चिन्हा बाबत निवडणूक आयोग काय निर्णय देईल याच्या कडे सर्वांचं लक्ष आहे. त्यात आता शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी शिवसेनेचा चिन्ह धनुष्यबाणा वर वक्तव्य केलं. “यांना माहिती नाही की, निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेताना एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते आणि एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं याचाही विचार करेल,” असं मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी ते मद्यमांशी बोलत होते.

“निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचं स्वागत करू. तसेच एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. मात्र, आम्हाला १०० टक्के विश्वास आहे की, धनुष्यबाण निश्चितपणे आम्हाला मिळेल. पूर्ण बहुमत आमच्याकडेच आहे.” असे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटले. “एक आमदार निवडून यायला तीन तीन लाख मतदान असते. एक खासदार निवडून आणण्यासाठी २० लाखांचं मतदान असतं. यांना अजून याची कल्पना नाही, यांना माहिती नाही की, हे सर्व यात गृहित धरलं जाईल,” असं मत रामदास कदम यांनी व्यक्त केलं.

पक्षातील बहुमतावर बोलताना रामदास कदम म्हणाले, “याआधीचे निवडणूक आयोगाचे निकाल पाहिले तर ज्याच्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती बहुमत आहे त्यांच्याच बाजूने निकाल येतो. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क आणि बीकेसी येथेही अधिक ताकद कुणाकडे आहे हे सिद्ध झालंय. लोकशाहीत ज्याच्याकडे अधिक संख्या त्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.” “आमची शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला वेळ लागणार नाही. यावर आजच निर्णय होईल,” असंही कदमांनी नमूद केलं.

हे ही वाचा:

१०० दिवसांत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला; सत्ताधाऱ्यांचीच खुलेआम गुंडगिरी, काँग्रेसचा आरोप

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात कोण आहे पप्पू?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss