Monday, September 30, 2024

Latest Posts

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मुदत वाढ, आयोगाचं उद्धव ठाकरेंना पत्र

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं शिंदे गटाचा निवडणूक आयोगात दावा केला आहे. या दाव्याची तातडीने दखल घेत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाला मुदत मांडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता १४ तारखेआधी धनुष्यबाण गोठवलं जाणार का? याबाबत आता उत्सुकता वाढला आहे.

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून मुदतवाढीची माहिती दिली आहे. तसंच त्यांना हवा असलेला शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील ४ तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. या पत्रासोबत पुन्हा एकदा तो तपशील पाठवला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

हेही वाचा : 

Ind vs Pak Women- पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी केला पराभव

शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या दाव्याची तातडीनं दखल घेत निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पाहावं लागेल. शिवाय अंधेरीतल्या पोटनिवडणुकीआधी चिन्हाचा फैसला येणार की चिन्ह गोठवलं जाणार हे स्पष्ट होईल.

१०० दिवसांत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला; सत्ताधाऱ्यांचीच खुलेआम गुंडगिरी, काँग्रेसचा आरोप

अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटानंही आयोगाला पत्र लिहून चिन्हाचा निर्णय तातडीनं व्हावा ही विनंती केली आहे. आपल्या बाजूनं ४० आमदार, १२ खासदार, १४४ पदाधिकारी, ११ राज्यप्रमुख असल्याचा दावा शिंदे गटानं आयोगासमोर केलेला आहे. सोबतच १ लाख ६६ हजार ७६४ प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही सादर करण्यात आलीत. अर्थात याला तोडीस तोड उत्तर देण्याच्या तयारीत ठाकरे गटही आहे. कारण प्रतिनिधी सभेतले ७० टक्के सदस्य, २६० पैकी जवळपास १६० सदस्य हे आमच्याच बाजूनं असते.

मकरंद अनासपुरेंचा ‘हा’ नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

Latest Posts

Don't Miss