spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोजागिरी पोर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्रथा आहे. कोजागिरी पौर्णिमा ९ ऑक्टोबर २०२२ रोजी साजरी करण्यात येत आहे. कोजागिरी पौर्णिमा शरद ऋतू मध्ये येत असल्याने तिला शरद पौर्णिमा देखील म्हटले जाते. या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. आणि उत्साहात कोजागिरी पौर्णिमा हा सण साजरा करण्यात येतो. कोजागिरी पोर्णिमेमध्ये मसाले दूध पिण्याचे खूप महत्व आहे.

हे ही वाचा : सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

 

मसाले दूध बनविण्याचे महत्व –

शरद ऋतुमध्ये मसाला दूध बनवणे चांगले मानले जाते. कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध बनवण्याचीप्रथा आहे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध पिले जाते. चंद्राचे किरण मसाले दुधावर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.

मसाले दूध बनविण्याचे साहित्य –

एक लिटर दूध

अर्धा कप साखर

काजू, बदाम,पिस्ता

विलायची पावडर

जायफळ पावडर

एक चमचा खसखस

चार ते पाच खारीक

केसर

 

मसाले दूध बनविण्याची कृती –

सर्व प्रथम दूध एका भांड्यात काढून घ्यावे आणि ते उखळण्यासाठी गॅसवर ठेवावे. दूध उकळे पर्यंत मसाला तयार करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम,वेलची , खसखस आणि जायफळ, एकत्र करून बारीक वाटून घेणे. आणि खारिक मिक्सर मध्ये वाटून बारीक करून घेणे. आणि तयार केले मिश्रण दुध उखाळ्यानंतर त्यामध्ये घालून घेणे. मिश्रण टाकल्यानंतर त्याला सारखे सारखे ढवळत राहावे. म्हणजे मसाल्याच्या गुठळ्या होणार नाही. आणि मिश्रण चांगले ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि केसर , काजू , बदाम , वरून घालणे आणि १० ते १५ मिनिटे शिजवत ठेवणे. दूध शिजून झाल्यानंतर त्याला चंद्रा समोर ठेवणे आणि मग ते सेवन करणे.

हे ही वाचा :

कडू कारल्यापासून बनवा स्वादिष्ट सीख कबाब; जाणून घ्या रेसिपी

 

Latest Posts

Don't Miss