spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Rain Update: राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात, मुंबई-उपनगरात ‘यलो अलर्ट’ जारी

मुंबईसह राज्यभरात पावसाने २ आठवड्यांपासून दडी मारली होती. मात्र मुंबईसह उपनगर भागात आज (७ ऑक्टोबर) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.राज्यात पुढच्या तीन-चार तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, नगरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. तर मुंबईनजीकच्या ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Indian Air Force Day 2022: भारतीय वायुसेनाचा ९०वा वर्धापन दिन, चंदिगडमध्ये आज एअर फोर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. आज मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान १० ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगण्यात आलं आहे.

पालघर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा भात शेतीला फटका बसलाय. ठिकठिकाणी भातशेती कापणीला सुरुवात झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे कापून शेतात सुकण्यासाठी ठेवलेलं पीक पूर्णपणे नष्ट झालंय. बळीराजा पुन्हा एकदा संकटात आलाय.

सीताफळापासून बनवा रबडी घरच्या घरी

Latest Posts

Don't Miss