spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकलने प्रवास करणार आहात? तर नक्की वाचा, मध्य रेल्वेने रविवारी…..

आज आणि उद्या जर तुम्ही लोकल ट्रेननी प्रवास करणार आहात तर तुम्ही ही बातमी नक्की पूर्ण वाचा. लोकलनी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांन साठी महत्वपूर्ण बातमी आली आहे. रविवारी मुंबई लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे कारण रेल्वे विभाग पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेच्या उद्देशाने मेगा ब्लॉक घेणार आहे. “हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स/जंबो ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे मध्य रेल्वेने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. प्रत्येक वेळी, रेल्वे ऑपरेशनल आणि देखभाल संबंधित कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.

ठाणे-कल्याण आणि कुर्ला-वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. कुर्ला फलाटावर पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी शनिवार-रविवारी मध्यरात्री विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. डहाणू यार्डामध्ये यांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने शनिवार-रविवार दिवसा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळामध्ये लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. मार्ग – अप आणि डाऊन जलद वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०. ब्लॉक काळात अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप-डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे: स्थानक – कुर्ला ते वाशी, मार्ग – अप आणि डाऊन, वेळ – सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशीदरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. हार्बर प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे: स्थानक – वसई रोड ते वैतरणा, मार्ग – अप-डाऊन जलद,वेळ – मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० (शनिवार-रविवार मध्यरात्री). ब्लॉक वेळेत विरार-भरूच मेमू १५ मिनिटे विलंबाने धावणार आहे. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

हे ही वाचा:

Maharashtra Rain Update: राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात, मुंबई-उपनगरात ‘यलो अलर्ट’ जारी

Indian Air Force Day 2022: भारतीय वायुसेनाचा ९०वा वर्धापन दिन, चंदिगडमध्ये आज एअर फोर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss