spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२० वर्षीय गोविंदा प्रथमेशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली

दहीहंडी उत्सवा मध्ये गंभीर जखमी झालेला गोविंदा प्रथमेश याचं आज मृत्यू झाला आहे. दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रथमेश सावंत असे या गोविंदाचे नाव आहे. करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र शनिवारी त्याची प्राणज्योत मावळली. या वर्षी दहीहंडी उत्सवातनंतर गोविंदाचे निधन होण्याची ही दुसरी घटना आहे. प्रथमेशच्या आधी २४ वर्षीय गोविंदा संदेश दळवी याचे निधन झाले होते.

दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. प्रथमेशच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून प्रथमेशच्या कमरेखालील भागातील संवेदना बाधित झाल्या होत्या. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळे चुलत्यांकडेच प्रथमेश वास्तव्याला होता. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. तसेच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहचविण्याचे काम करत असे. अनाथ असलेल्या प्रथमेशने लहान वयातच आपली आई कॅन्सरने गमावली होती. लागोपाठच्या एका वर्षात त्याने वडिलांना कावीळ आणि बहीणीला एका अज्ञात आजाराने गमावले. प्रथमेशला मावशी वैशाली सावंत यांनी संभाळले होते.

यंदाच्या वर्षी कोरोना महासाथीचा जोर ओसरल्याने दहीहंडीवर जल्लोषात साजरी करण्यात आली. सरकारनेदेखील यंदा दहीहंडीवर निर्बंधमुक्त असणार असल्याची घोषणा केली होती. प्रथमेश हा आपल्या स्थानिक मंडळाच्या गोविंदा पथकात सहभागी झाला होता. दहीहंडी फोडताना गोविंदाच्या थरावरून कोसळल्याने प्रथमेशला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पाठिचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना बंद झाली होती. प्रथमेशवर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

हे ही वाचा:

Mirzapur : पंकज त्रिपाठी यांनी चित्रपट,ओटीटी आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून किती कोटी कमावतात हे तुम्हाला माहिती आहे का?

मोदी आणि शाह यांची आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं : जयवंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss