spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Kurla Fire: कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, आगीचं कारण अद्याही अस्पष्ट, बचावकार्य सुरु

मुंबईतील कुर्ला येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकल्याची माहिती मिळतेय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहे.

कुर्ला येथील नवीन टिळक या परिसरातील एका इमारतीच्या १० ते ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या इमारतीतून धुराचे लोट येत असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर इमारतीतील इतर लोकांना बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. परंतु इमारतीमधील रहिवासी मदतीच्या अपेक्षेत आहेत. एकूण १३ मजली इमारत आहे. त्यातील वरच्या मजलेल्या आग लागली असून तिथे अनेक कुटुंब अडकले असल्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss