spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : नवरा बायकोच्या प्रेमाचं नात जपणारा ‘दिवाळी पाडवा’ सणाची जाणून घ्या परंपरा

दिवाळी मधील पाडवा हा अतिशय महत्वाचा सण आहे. पाडवा म्हणजे नवरा बायकोच्या प्रेमाच नात जपणारा दिवाळी पाडवा होय. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. या सणामध्ये एकमेकांना भेट देण्याची परंपरा आहे. जर नवीन विवाहित जोडप असेल तर पाडवा थोडा खास असतो. यावर्षी २४ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा साजरा करण्यात येत आहे. आणि या दिवशी घरा समोर सुंदर रांगोळी काढतात. आणि दिव्यांनी घर सजवले जातात. त्यामुळे आकर्षक रोषणाई केली जाते. नवीन वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान केले जाते. चला तर , मग जाणून घेऊया दिवाळी पाडव्याची परंपरा.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळी का साजरी केली जाते ? घ्या जाणून

 

दिवाळी पाडवा २०२२ परंपरा :

पाडव्याच्या दिवशी पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे. आणि नवऱ्याला पाटावर बसून पाटाभोवती रांगोळी काढली जाते आणि नवऱ्याचे औक्षण केले जाते. लग्नझाल्यानंतर आपला संसार चांगला आणि आपल्या मधील प्रेम , आपुलकी , जिव्हाळा सतत वाढत राहावा यासाठी बायको नवऱ्याला औक्षण करत असते. नवरा सुद्धा देखील बायकोला चांगली भेट वस्तू देतो. नवीन विवाहित जोडप्यांसाठी दिवाळीचा पाडवा खूप खास असतो. या दिवशी नव विवाहित जोडप्यांची पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळसण केला जातो. आणि जावयाचा मान म्हणून त्याला चांगली भेट वस्तू दिली जाते. या दिवशी तुम्ही नवऱ्याकडे भेट वस्तू म्हणून तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती तुम्ही मागू शकता. आणि या दिवशी सोने खरेदी करण्याची पद्धत आहे.

 

पाडवा भेट वस्तू –

पाडवा भेट वस्तू म्हणून तुम्ही टूर पॅकेज देखील देऊ शकता. दोन वर्षांनंतर लोकडाऊन मुळे कुठे बाहेर जाता आले नाही. त्यामुळे तुम्ही टूर पॅकेज देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवता येईल.

पाडवा म्हणून तुम्ही नवऱ्याला फोन , आय वॉच किंव्हा एखादा दागिना या वस्तू देखील तुम्ही देऊ शकता.

पाडव्यानिमित्त तुम्ही बायकोला सोन देखील देऊ शकता.

हे ही वाचा :

Diwali 2022 : फटाकेपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss