spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी

चॉकलेट केक सर्वांना आवडतो. आजकाल चॉकलेट केक घरी बनवणे खूप सोपे झाले आहे. हा केक लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. चॉकलेट केक मध्ये बरेच प्रकार असतात. कोणतेही कार्यक्रम असेल तर केक कापला जातो. जसे की वाढदिवस , साखरपुडा , लग्न , सेलिब्रेशन , असो केक कापला जातो. तर आज आम्ही तुम्हाला चॉकलेट केक कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : जाणुन घ्या… मसाले भात करण्याची रेसिपी

 

रेसिपी –

साहित्य –

२ वाटी मैदा

१ वाटी तूप

१ वाटी पिठीसाखर

१ वाटी लोणी

२ अंडी

१ काप दूध

१\२ चमचा खाण्याचा सोडा

१\२ चमचा बेकिंग सोडा

३\४ ते चार चमचे कोको पावडर

२ चमचे चॉकलेट सिरप

 

कृती –

चॉकलेट केक बनवताना अंडी फोडून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात बिटरच्या साह्याने एकजीव करून घ्या. मग त्यामध्ये मैदा आणि साखर लोणी घालून एकजीव करून घ्या. मग त्यामध्ये बेकिंग सोडा , खाण्याचा सोडा , कोको पावडर , चॉकलेट सिरप ,बिटरच्या साह्याने फेटून घ्या. आणि कुकरची शिटी आणि रिंग कडून घ्या. त्यानंतर केकचे बेटर घालणार आहोत एका भांड्याला लोणी लावून घ्या आणि त्यावर मैंद हलका घालून घ्या त्यामुळे केक चिकटणार नाही. त्यानंतर केकचे बेटर ज्या भांड्यात भाजणार त्यामध्ये तो केक घालून घ्या. आता कुकर मध्ये केकचे बेटर ठेवा आणि वरून काजू बदाम घालून घ्या. आणि १० ते १५ शिजवून घ्या. आणि केक तयार आहे.

हे ही वाचा :

सीताफळापासून बनवा रबडी घरच्या घरी

 

Latest Posts

Don't Miss