spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आरएसएस इंग्रजांची मदत करत होते; सावरकर यांना इंग्रजांकडून आर्थिक भत्ता मिळत होता – राहुल गांधी

काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आर एस एस वर आणि स्वतंत्र वीर सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आली आहे. या यात्रेला १०० दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी तुमकुरुमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता, असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी आरएसएस आणि सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार आरएसएस इंग्रजांची मदत करत होते. तसेच सावरकर यांना इंग्रजांकडून आर्थिक भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्ये आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप कुठेही दिसणार नाही. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं.

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात बंड केले. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभ भाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असे राहुल गांधी म्हणाले. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेद व्यक्त केला. राहुल गांधी यांना इतिहास माहित नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा:

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले

क्रिमियाला रशियाशी जोडणाऱ्या एकमेव पुलावर मोठा स्फोट ;घटनेत तीन लोकांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss