spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची घोषणा केली आहे.

ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) यांच्यात सुरू असणाऱ्या निवडणूक आयोगानेमुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. १० ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याची घोषणा केली आहे.

ठाकरे गटाची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. निशाणी कोणतीही असली तरी अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच लढेल आणि जिंकेल असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे गटाची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा तात्पूरता आहे की कायमचा आहे याबाबत तपासलं पाहिजे, काहीही असलं तरी आमचा दावा चिन्हावर आहेच असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. पण निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल तो मान्य करुन पुढे जावं लागेल, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे ; नाना पटोले

आरएसएस इंग्रजांची मदत करत होते; सावरकर यांना इंग्रजांकडून आर्थिक भत्ता मिळत होता – राहुल गांधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss