spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजप केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेले दिसून आहे. त्यात भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना एकाच गाडीत पहिल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष शिघेला पोहोचला आहे. दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपचा सामना सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये (Aurangabad) ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळापूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.

कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी वेगानं घडत आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला भेटणार या कडे सगळण्याचं लक्ष असतानाच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचं निर्णय घेतला आहे. यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज आणखी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांची. या दोन्ही नेत्यांनी औरंगाबादमध्ये एकाच गाडीतून प्रवास केला आहे.

यातच भाजपा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबादहून गेवराईच्या दिशेने गेले आहेत. गेवराईत आज माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. शिवाजीराव पंडीत हे शरद पवार यांच्या निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज गेवराईत होणार आहे. या सोहळ्याला शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पक्षातील दिग्गज नेते उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्र दिलीपराव देशमुख, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

Sharad Purnima 2022: आयुर्वेदानुसार शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर ठरू शकते आयोग्यासाठी उपयोगी, जाणून घ्या कशी?

Sharad Pawar : “शिवसेना संपणार नाही तर…” सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर पवारांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss