spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं…’, एकनाथ खडसे

ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याचे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा असे एकनाथ खडसे म्हणाले. वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी घालवलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक असल्याचे खडसे म्हणाले. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाबाबत एकनाथ खडसे यांनी ही खंत व्यक्त केली.

विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि काँग्रेस आमदार शिरीष चौधरी हे डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे, यावर खडसे म्हणाले, या केसच भवितव्य आता अंधारात आहे. रश्मी शुक्ला ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी रश्मी शुक्लाना क्लिन चिट मिळेल अस वाटलं होतं. फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना त्या ठिकाणी त्या प्रमुख होत्या. माझा ही फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला. कोणत्या कारणासाठी माझा फोन टॅप करण्यात आला याची मला अजूनही कल्पना देण्यात आलेली नाही. एफआयआर दाखल झालेला आहे. चौकशी सुरू आहे असं सांगण्यात येत. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लिन चिट दिली आहे , त्यामुळे या केसच भवितव्य आता अंधारात आहे.

काँगेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी हे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे त्यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, केंद्राच्या यंत्रणांनी कायदा नियम आणि घटनेचा चोळामोळा करायचे ठरवलेच आहे, तर काय बोलायचं. एवढेच मला एक सामान्य माणूस म्हणून वाटते, राजकीय व्यक्ती म्हणून नाही. या देशाची घटना, स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायची आहे हे काम जर चाललेल असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा काय करायचं आहे .

हे ही वाचा:

ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; दोन्ही गटांना हवं असलेलं नवं नावही सारखंच

Cremia Bridge explosion: स्फोटानंतर रशियन सरकार लवकरच करणार पुलाची पाहणी

भाजप केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss