Monday, September 30, 2024

Latest Posts

चिन्हं गोठवल्याचं दु:ख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला – दीपक केसरकर

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं धनुष्यबाण चिन्ह मागणार आहोत. आमच्याकडे जास्त लोकं आहेत. चिन्हं गोठवल्याचं दु:ख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. जर त्यांना वाईट वाटत होतं तर त्यांनी नवीन चिन्हं आणि नावं का दिलं? आम्ही आजही आमच्या चिन्हांवर आणि पक्षावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडून आमचं चिन्हं मागणार आहोत अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

“निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. खऱ्या अर्थाने धनुष्यबाण चिन्हावर आमचाच अधिकार आहे. आमच्याबरोर आमदार, खासदार जिल्हाप्रमुख, नगरसेवक आहेत. आज धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने दुख झाल्याचे जे सांगतात, तेच या निर्णयाला जबाबदार आहेत. आम्ही वेळेवर कागदपत्रे दाखल केले असताना त्यांनी वेळोवेळी तारखा मागितल्या आहेत. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय दिला”, अशी प्रतिक्रिया केसकर यांनी दिली आहे. “प्रत्येकवेळी तारखा मागायच्या, कागदपत्र सादर करायचे नाही, वरून निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं तर आम्हाला जबाबदार धरायचं, हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत लोकांची सहानुभूती कशी मिळेल, याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी जाणीवपूर्वक आयोगात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही”, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. “आमच्याकडे जे बहूमत आहे. त्यानुसार आम्ही आोगाकडे ‘धनुष्यबाण’ चिन्हाची मागणी करणार आहे. आमची बाजू खरी आहे. त्यामुळे हे चिन्हा आम्हालाच मिळेल ”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना केसरकर यांनी आदित्य ठाकरे याना लक्ष केलं आहे. ते म्हणाले आहेत की, आदित्य ठाकरे रोज खोक्याचं ट्वीट करतायत. कारण त्यांना खोक्याचीच सवय आहे. शब्द त्यांना जवळचा आहे. हे ट्वीट बंद करा, आम्ही त्याला उत्तक देणार नाही. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यानंतर ७०० लोकहिताचे निर्णय घेतले. ते दिवसरात्र फिरून काम करत आहेत. अंधेरीतील पोटनिवडणूक बाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरीतून कोण निवडणूक लढवणार याचा अद्याप निर्णय झालेला नाही.

आमच्या विरोधात निकाल दिला, तर ती संस्था चुकीची ही भूमिका घेणं चुकीचं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. “निवडणूक आयोगाने असा निर्णय पहिल्यांदाच घेतला असे नाही. यापूर्वी तामिळनाडूमध्येही जयललिता आणि पनिरसेल्वम यांच्या बाबतीत घेतला होता. आमचं बाळासाहेबांवर प्रेम आहे, त्यामुळे आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे. मात्र, लोकांची सहानुभूती मिळवायची, निवडणुका जिंकायच्या, विचारधारेपासून दूर जायचे, हा प्रकार सध्या सुरू आहे”, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

Devendra Fadanvis : धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर, देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss