Monday, September 30, 2024

Latest Posts

शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढणार ?

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट झाल्याचं आपण पाहिलं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. आता दोन्ही गटाकडून मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. त्यातच आता शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक शिंदे गट लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आज रविवारी पुन्हा ही निवडणूक शिंदे गट लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचे आमदार आज एकनाथ शिंदे यांना अंधेरी पोटनिवणूक लढवण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आजच्या बैठकी नंतर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशुळ या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह द्यावं, अशी मागणी निवडणूक आयोगाला केलीय. त्यामुळे आता शिवसेनेला कोणतं चिन्ह मिळणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

भाजपच्या फायद्यासाठी शनिवारी शिंदे गटाकडून एक निर्णय जाहीर करण्यात आलेला होता. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढणार नसल्याचं शिंदे गटाने जाहीर केलं होतं. परंतु आज शिंदे गटाच्या आमदारांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गट ही पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघ रिक्त झाला असल्याने या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. दरम्यान, भाजपने या मतदार सघांची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवली आहे.

हे ही वाचा:

चिन्हं गोठवल्याचं दु:ख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला – दीपक केसरकर

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss