spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

तसेच तोंडात टाकली की लगेच विरघळणारी, खुसखुशीत अशी शंकरपाळी सर्वांनाच अतिशय आवडते.

शंकरपाळी हा करण्यास अगदी सोपा आणि चवीस अगदी स्वादिष्ट असा दिवाळी फराळातील पदार्थ आहे. कुठल्याही वेळी, फराळ मध्ये पाहुण्यांसाठी इतर दिवाळी फराळा सोबत शकंरपाळी दिली तर उत्तमच. तसेच तोंडात टाकली की लगेच विरघळणारी, खुसखुशीत अशी शंकरपाळी सर्वांनाच अतिशय आवडते. करंजी प्रमाणेच शंकरपाळी हा देखील दिवाळी फराळाची रंजक वाढवणारा पदार्थ आहे.शंकरपाळी हा दिवाळीत केला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. बऱ्याच जणांच्या घरी गोड खुशखुशीत शंकरपाळी बनवली जाते. गोड शंकरपाळी मैद्यापासून तयार करण्यात येते. तळल्यानंतर ही शंकरपाळी अतिशय खुशखुशीत लागत असून तोंडात टाकल्यावर लगेच विरघळते. दिवाळीच्या फराळात गोड खुशखुशीत शंकरपाळी खाण्याची मजा काही वेगळीच असते.

साहित्य:
  • अडीच वाटी मैदा
  • अर्धी वाटी रवा
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • पाव वाटी दूध
  • पाव वाटी तूप
  • चवीपुरतं मीठ
  • तळण्यासाठी तेल
गोड खुशखुशीत शंकरपाळी बनवण्याची कृती:
  • रवा आणि मैदा चाळून घ्यावा
  • सर्व साहित्य जवळ ठेवून पीठ मळण्यासाठी बसावे पिठीसाखर आणि दूध एकत्र करावे
  • पीठ मळताना त्यात चिमूटभर मीठ टाकावे
  • पीठ मळण्यापूर्वी त्यात एक पाव वाटी तूप चांगले गरम करून ओतावे याला मोहन असं म्हणतात
  • चमच्याने सर्व साहित्य एकत्र करावे.
  • तूप थंड झाल्यावर मैदा आणि रवा त्या तूपावर मळून घ्यावा.
  • दूध आणि साखरेचा हात लावत पीठ फार कडक नाही आणि फार सैल नाही असे मळून घ्यावे
  • अर्धा तास पीठाच्या गोळ्यावर ओले फडके ठेवून ते बाजूला ठेवावे
  • अर्धा तासाने पुन्हा एकदा मळून घ्यावे आणि त्याचे ठराविक भाग करावे
  • पीठाचा मोठा गोळा मळून त्याची जाडसर पोळी लाटावी.
  • शंकरपाळीचा साचा अथवा सुरीने शंकरपाळीचे आकार पाडावे.
  • सर्व पीठाच्या शंकरपाळे करून घ्यावे
  • गॅसवर तेल अथवा तूप गरम करावे
  • सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळे तळून घ्यावे
  • थंड झाल्यावर शंकरपाळी हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

हे ही वाचा:

कोलकता स्पेशल रसगुल्ला घरच्या घरी बनवा

घरच्या घरी बनवा शेवयांची चविष्ठ खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss