spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नखांची काळजी घेण्याच्या टिप्स: सुंदर आणि लांब नखे मिळविण्यासाठी करा ‘ हे ‘ घरगुती उपाय

तुम्हालाही सुंदर आणि लांब नखं हवी असतील तर त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी काही घरगुती उपाय करून तुम्ही सुंदर नखे मिळवू शकता.

नखांची स्वच्छता आणि मजबुतीशिवाय परिपूर्ण आकार मिळू शकत नाही. तुमच्या तुटलेल्या नखांनी किंवा त्यांच्या निर्जीव रंगामुळे तुम्हालाही त्रास होत असेल, तर आताच टेन्शन सोडा. या होममेड नेल केअर टिप्सद्वारे, नखांची चांगली काळजी घरच्या घरी केली जाऊ शकते आणि आपल्याला इच्छित आकार मिळू शकतो. तुम्हालाही सुंदर आणि लांब नखं हवी असतील तर त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी काही घरगुती उपाय करून तुम्ही सुंदर नखे मिळवू शकता.

अशी घ्या नखांची काळजी:

  • जर तुम्ही नखे मोठी ठेवली तर त्यांच्या आकारावरच नव्हे तर त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. नखे कापण्यापूर्वी कोमट पाण्यात ५ मिनिटे ठेवा. असे केल्याने नखे सहज कापता येतात. नखांच्या छिद्रांना तेल किंवा मलईने मसाज केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते.
  • जर तुमचे नखे पातळ असतील आणि त्वरीत तुटतील, तर त्यांच्या ताकदीची काळजी घेणे आवश्यक आहे. गरम पाण्यात दोन चमचे जिलेटिन पावडर टाका. त्यात लिंबाचा रस किंवा थोडे दूध आणि गुलाबपाणीही घालू शकता आणि मग त्यात ५ मिनिटे नखे बुडवून ठेवा.
  • रात्री झोपण्यापूर्वी नखांवर ऑलिव्ह ऑईल लावल्याने नखे लवकर वाढण्यास मदत होईल. ऑलिव्ह ऑइलमध्ये एक व्हिटॅमिन ‘ई’ कॅप्सूल फोडून ते मिसळा आणि झोपण्यापूर्वी त्यात हात बुडवा आणि आठवड्यातून दोनदा हे करा.
  • नखांवर लसूण चोळा – याने १० दिवसात तुमची नखे चांगली वाढतील. ही प्रक्रिया तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी करावी लागेल.
  • संत्र्याचा रस – एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग काढून त्यात २ चमचे संत्र्याचा रस पिळून घ्या. हे द्रावण ५ मिनिटे नखांवर ठेवा. त्यात व्हिटॅमिन सी असते जे कोलेजन बनवते ज्यामुळे नखे मजबूत होतात.
  • खोबरेल तेलामध्ये फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात, जे नखांवर लावल्यास फायदा होतो.

हे ही वाचा:

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेनिमित्त अशा सोप्या पद्धतीने बनवा पारंपरिक मसाले दूध

Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौणिमेदिवशी मसाला दूध पिणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss