spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे-ठाकरे गटांचे कोणते नवं चिन्हे व नाव?,आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तात्पुरते गोठविल्यानंतर ठाकरे गटाने पक्षासाठी तीन नावांचा आणि तीन चिन्हांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केला आहे. यातील कोणते नाव आणि कोणते चिन्हं उद्धव ठाकरे गटाला मिळणार, याचा निर्णय आज निवडणूक आयोग देणार आहे.आज सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत याबाबत पर्याय देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना केली होती. ठाकरे गटाने पर्यायी नावे आणि चिन्हे सादर केली असली तरी शिंदे गटाने अद्याप ती सादर केलेली नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीपूर्वी शिंदे गट पर्यायी चिन्हे आणि नावे सादर करण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं नाव काय आणि या पक्षाचं निवडणूक चिन्हं कोणतं? याचा फैसला आज निवडणूक आयोग करणार आहे. तर, ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नाव आयोगाला सूचवण्यात आली आहेत. तर त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय देण्यात आलेत. निवडणूक आयोग यातल्या कोणत्या पर्यायांवर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता आहे.

हेही वाचा : 

Abdul Sattar : शिंदे गटात राडा, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ केल्याचा दावा

तर दुसरीकडे शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हाचे पर्याय दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हाला प्राधान्य असल्याची चर्चा आहे. तसंच पक्षाच्या नावात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा उल्लेख ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितील दिलेली नाही. वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय.

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर काल रविवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत माध्यमांशी संवाद साधताना म्हटले, निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार आम्ही प्राधान्यक्रमानुसार तीन चिन्हे आणि तीन नावांचा पर्याय सादर केला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आम्हाला निवडणूक आयोगाकडून त्यापैकी एक चिन्ह आणि एक नाव मिळेल. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर ‘आमचं चिन्हं ठरलं’ अशा घोषणा मातोश्रीबाहेर जमलेल्या ठाकरे समर्थकांनी दिल्या.

Diwali 2022: दिवाळीत बनवा घरच्या घरी खुसखुशीत आणि खमंग अशी ‘ शंकरपाळी ‘

Latest Posts

Don't Miss