spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर राष्ट्रवादीचे विचार लादले ; भाजपाचा ठाकरे गटला टोला

निवडणूक आयोगाकडून शिवनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानं आता ठाकरे गटाला निवडणूक दुसऱ्या चिन्हावर लढवावी लागणार आहे. तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मोठा फटका हा ठाकरे गटला बसला आहे. तर ठाकरे गट देखील अडचणीत आला आहे. या सर्व परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे विचार घुसवले, त्यांच्यामुळे आज शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची वेळ आली. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी आता तरी सुधारावे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

शिंदे-ठाकरे गटांचे कोणते नवं चिन्हे व नाव?,आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांना बाळासाहेबांनी स्वाभीमान शिकवला आहे, शिवसैनिक बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन चालत आहे. जर या शिवसैनिकाला कोणी जय शरद पवार, जय सोनिया, जय राहूल गांंधी असा विचार जर कोणी शिकवण्याचा प्रयत्न केला, तर तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा अशी परिस्थिती तर निर्माण होणारच, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.

शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटांची चिन्हे व नावांचा आज फैसला

५६ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या, आणि नंतर राज्याच्या राजकारणात अविभाज्य भाग बनलेल्या शिवसेनेत सर्वात मोठ्या बंडानंतर प्रथमच नाव आणि चिन्हासाठी संघर्ष करण्याची वेळ आलीय. त्यामुळे या संघर्षात ठाकरेंच्या शिवसेनेला कोणतं नाव आणि चिन्ह मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

Abdul Sattar : शिंदे गटात राडा, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ केल्याचा दावा

दरम्यान, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना सोमवारी १० ऑक्टोबर२०२२ पर्यंत त्यांच्या पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह सुचवण्यास सांगितलं आहे.

४० डोक्यांच्या रावणानं चिन्ह गोठवलं : उद्धव ठाकरे

४० डोक्यांच्या रावणानं प्रभू रामाचं शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, जी शिवसेना तुमची आई आहे, तिच्या काळजात कट्यार घुसवली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. काल उद्धव ठाकरेंनी सोशलल मीडियावरुन जनतेला शिवसैनिकांना संबोधित केलं. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र डागलं होतं.

Diwali 2022: या दिवाळीत बनवा खमंग भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

Latest Posts

Don't Miss