मेष: आज कामाची गती मंदावेल. अचानक होणाऱ्या खर्चाच्या वाढीमुळे धावपळ करायला लागेल. शारीरिक कमजोरीमुळे दगदग जाणवेल. प्रवासातून संकल्पित उद्देश साध्य होणार नाही. कर्ज घेणे टाळावे. परधनाची लालसा वाढू देऊ नका. धार्मिक पूजा-उपासनेमुळे मनाचे सामर्थ्य स्थिर रहाण्यास मदत मिळेल.
वृषभ: व्यावसायिक क्षेत्रात आर्थिक उन्नती होईल. प्रासंगिक चर्चत संवाद कौशल्य कामास येईल. बऱ्याच काळापासून संथ गतीने चाललेले विषयासंबधीत प्रश्न सुटतील. दिवसाची सुरुवात आनंदाची आहे. महत्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखा. वागण्या बोलण्यात सहजता राहील.
मिथुन: पूर्वनियोजित कामानिमित्त भ्रमंती होईल. पारंपरिक शिक्षण कौशल्य कामी येईल. नोकरदारांवर वरिष्ठ नाखुश राहतील. दिवसाचा उत्तरार्धअनुकूलआहे. शक्यतो आज अगोदरची शिल्लक कामे उरकून घ्यायचा प्रयत्न करा. तुमची कारकीर्द वादाची ठरणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल.
कर्क: सरकार दरबारी आज तुमचा मानसन्मान प्राप्त होईल. गुत्तेदारानं सरकारी कामातून लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. कोणत्याही विषयाला समजून घेऊन त्यावर मोजक्या शब्दात भाष्य करा. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणताही तर्क लाऊ नका. तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करा.
सिंह: तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्हाला बदनामीचा धोका आहे. न्यायालयीन कामकाजात कमी बोला.कितीही घाईचे काम असले तरी वाहन काळजीपूर्वक चालवा. दिवसाचा पूर्वार्ध त्रासदायक आहे. सर्वसामान्य जीवन पद्धती आज तुम्हाला तुमचे इष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. कोणताही खर्च आपली करण्यापूर्वी आवक किती आहे याचा जरूर विचार करा.
कन्या: बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या विषयी खुशखबर ऐकायला मिळेल. सहकाऱ्यांशी सूर जुळतील. अनपेक्षित चांगली बातमी समजेल. महत्वाची कामे सकाळच्या काळात उरकून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे. वयोवृद्ध मंडळींना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
तुळ: तुम्ही करीत असलेल्या परिश्रमाला न्याय मिळेल. आज उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. व्यावसायिकांनी महत्वाचे करार आज पूर्ण करा. द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. राजकारणात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून अनमोल सहकार्य लाभेल.
वृश्चिक: आज आपले मन प्रसन्न राहील. कामकाजासाठी उत्तम दिवस आहे. बऱ्याच काळापासून उत्तर न मिळालेले प्रश्न अगदी सहजतेने मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत किंवा तत्सम क्षेत्रात यश मिळेल. आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाल तर संस्थेत विनालाभाच्या पदावर नियुक्ती मिळू शकेल.
धनु: आज उत्स्फूर्तपणे सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. चांगल्या घटनाक्रमामुळे मन आनंदी राहील.रहात्या घरात काहीतरी बदल कराल किंवा डागडुजीची कामे हाती घ्याल. तुम्ही ठरवलेली कामे विनाविलंब मार्गी लागतील. अकारण क्रोध टाळा. वाणीमध्ये मृदुता ठेवा. शब्दाच्या शस्त्राने कोणी घायाळ होणार नाही याची काळजी घ्या.
मकर: जवळचे आप्तेष्ट – कामासंबंधित मंडळी यांचे उत्तम सहकार्य लाभेल. खेळीमेळीच्या वातावरणात आजचा दिवस जाईल. आज अत्यंत सुखाचा दिवस आहे. आर्थिक उत्पन्नाचे श्रोत वाढतील. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या व्यावहारिक नियोजनाचा इतरांना देखील लाभ होईल.
कुंभ: आज आपण आपल्या कामात अधिक सकारात्मक असाल. आर्थिक आवक चांगली राहील.कलाकारांना कला क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कीर्ती आणि मानसन्मान यात वाढ होईल. तुमच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक केले जाईल. परदेशात खेळण्यासाठी जाण्याला संधी मिळू शकेल. तुमच्या बोण्यातून इतरानाही प्रेरणा मिळेल.
मीन: आपण करीत असलेल्या कामाला सामाजिक अधिष्ठान लाभेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. दिवसभर कामात व्यक्त व्हाल. मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या. अतिविश्वास घातक ठरेल. पारिवारिक संबंध सुधारतील. आज आपण सहलीचे नियोजन कराल. इतरांना सहकार्य करण्याची विचारधारा तुम्हाला मानसिक आनंद देईल.