spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India-Africa ODI Series : श्रेयसने शतक ठोकले तर, ईशानने रोहित व गांगुलीला विक्रम मोडला

भारतीय संघाने रविवारी रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. करा किंवा मरोच्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २७८ धावा केल्या. मात्र, टीम इंडियाने ४६ व्या षटकात लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताच्या या विजयात इशान किशननेही महत्त्वाची भूमिका बजावली.

इशान किशनने अवघ्या ८४ चेंडूत ९३ धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ७ षटकार आले. जरी त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक हुकले, परंतु या स्फोटक खेळीमुळे त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीसारख्या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकले.

हेही वाचा : 

मुंबईकरांनो सावधान ! शहरात पसरलीये डोळ्याची साथ…

डावखुरा स्फोटक फलंदाज इशान किशनने रविवारी रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात षटकार ठोकले. यासह, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या विक्रमांच्या यादीत या डावखुऱ्या फलंदाजाने रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांना मागे टाकले आहे.

श्रेयस अय्यरने २०२२ मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि १०३ धावा केल्या. आता यानंतर दोन वर्षांनी त्याने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या वनडे मालिकेत आतापर्यंत श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकावण्यात यश आले.

world mental health day 2022 : देशातील सुमारे १४ टक्के लहान मुलं नैराश्यात जगत आहेत?, काय असेल कारण

या सामन्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली आणि या दोघांनीही सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला मागे टाकले. श्रेयस आणि ईशान यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये तिसऱ्या विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी केली आणि सचिन आणि द्रविड तिसऱ्या क्रमांकावर गेले. यासोबतच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये भारताकडून तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करण्याचा विक्रम विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नावावर आहे.

समाजवादाचे मोठे स्तंभ असलेले मुलायम सिंह यादव यांचे निधन

Latest Posts

Don't Miss