spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Happy Birthday Rekha : रेखासोबत सहकलाकाराने गैरवर्तन केल्या प्रकरणी बिग बी संतापले…

Happy Birthday Rekha: बेधुंद करणारी नजर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने जिनं लाखो चाहत्यांना वेड लावलं ती अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा यांचा आज वाढदिवस आहे. त्या ६८ वर्षांच्या झाल्या आहेत. वयाचा आकडा वाढला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आजही तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशीच आहे.

Happy Birthday Rekha: बेधुंद करणारी नजर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारीने जिनं लाखो चाहत्यांना वेड लावलं ती अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा यांचा आज वाढदिवस आहे. त्या ६८ वर्षांच्या झाल्या आहेत. वयाचा आकडा वाढला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आजही तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशीच आहे. रेखा म्हणजे हिंदी सेनेसृष्टीतील एकेकाळी कायमच चर्चेत असलेलं नाव. बड्या बड्या अभिनेत्रींना देखील त्यांच्याबद्दल ईर्षा वाटायची. रेखा या प्रेमसंबंध तसंच त्यांचं खासगी आयुष्य अशा अनेक कारणांमुळे कायम चर्चेत राहिल्या. रेखा यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 अभिनेत्री रेखा यांचं आयुष्य जितकं सुंदर दिसतं तितकंच ते रहस्यांनी भरलेलं आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य सुरुवातीपासूनच व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले आहे. जरी अभिनेत्रीने स्वतः कधी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं काही बोललं नसलं तरी त्याबद्दलच चाहत्यांना अधिक वाचायला आवडतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress)

 रुपेरी पडद्यावर अमिताभ आणि रेखा ही जोडी चित्रपटप्रेमींना चांगलीच भावली होती. ही जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप चर्चेत असायची. या जोडीबाबत आजही अनेक किस्से चर्चेत आहेत. काही मुलाखतींमध्ये रेखानं आपल्या अनोख्या नात्याबाबत खुलासे देखील केले आहेत. तसेच एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखाने एका मुलाखतीत अमिताभ आणि तिच्यात नाते असल्याचे मान्य केले होते. अभिनेत्रीने सांगितले की, ‘तिच्या इमेज आणि मुलांसाठी तिने लोकांसमोर हे नाते स्वीकारले नाही. लोक काय विचार करतात, त्यांना काही फरक पडत नाही. याशिवाय रेखा पुढे म्हणाली, ‘लोकांना माझ्याबद्दल आणि त्याच्या प्रेमाबद्दल का कळायला हवं. दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे हे पुरेसे नाही का?’ एव्हरग्रीन अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘लोकांनी मला गरीब, वेडे म्हटले असेल. पण अमिताभचे १० लोकांशी संबंध नव्हते. तो खूप चांगला माणूस आहे. तो कोणाचेही मन दुखवू शकत नाही. मग सगळ्यांसमोर काही बोलून तो बायकोला कसा दुखावणार? मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा ‘गंगा की सौगंध’ चित्रपटात एकत्र काम करत असताना सेटवर एका सहकलाकाराने रेखासोबत गैरवर्तन केले. यावर बिग बी चांगलेच संतापले. या घटनेनंतर सर्वांना दोघांच्या प्रेमाची माहिती झाली.

एका मुलाखतीदरम्यान रेखा यांना विचारण्यात आले की अमिताभ बच्चन यांच्याकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर रेखा यांनी उत्तर दिलं की, ‘जेव्हा अमिताभसोबत ‘दो अनजाने’ चित्रपट करण्याची संधी मिळाली तेव्हा खूप घाबरली होती. शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर डायलॉग विसरायची.’ रेखाने याच मुलाखतीत पुढे सांगितले होते की, ‘अमिताभ यांचा ‘दीवार’ हा चित्रपट ‘दो अनजाने’च्या आधी प्रदर्शित झाला होता आणि त्यांची प्रतिमा सुपरस्टार अशी झाली होती. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना दबाव असायचा.’ अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित आणखी एक किस्सा सांगताना रेखा म्हणाल्या होत्या की, ‘ते कधीही चेहऱ्यावर दु:ख दिसू देत नाहीत, हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. कितीही त्रास झाला, पण तरीही कधीच घाबरत नाहीत.”

हे ही वाचा:

फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका; ४० डोक्याच्या रावणानं …

उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली…

शिवसेना संपवण्याचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदेंचा वापर – सुषमा अंधारे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss